परभणी जिल्हातील दिव्यांग लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ दिया. जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी अपंग सेल मोहम्मद अल्ताफ
पाथरी शहर प्रतिनिधि अन्वर खान. परभणी जिल्हयातील दिव्यांगाना शासनाच्या विविध योजना आहेत परंतु या योजनांची अंमलबजावणी शासनस्तरावर होत नाही . अंपगांना अंत्योदय योजने अंतर्गत राशन कार्ड उपलब्ध करुन देण्यात यावे दिव्यांगाना नगर परिषद व ग्रामपंचायत मार्फत दिल्या जाणारा 5 % टक्के निधी उपलब्ध करुन देण्यात यावा . UID कार्ड व अपंगत्वाचे प्रमाणपत्र लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्यात यावे .तसेच संजय गांधी श्रावणबाळ परितक्त्या यांना योजनेचे

पैसे 5 महिण्यापासुन अदयापही त्यांच्या बँक खात्यावर जमा झाले नाही ते जमा करुन लाभ मिळून देण्यात यावा . समाज कल्याण मार्फत बिज भांडवल 2 अनुदान उपलब्ध करुन देण्यात यावे अपंगाना विनाअट घरकुल उपलब्ध करुन देण्यात यावे व वनपासुन अदयापही अपंग व्यक्ती वंचित आहेत . तरी जिल्हाधिकारी परभणी यांना विनंती की लवकरात लवकर अपंग व्यक्तींना सोई सुविधा व योजनांचा लाभ मिळून देण्यात यावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात या निवेदन देताना परभणी राष्ट्रवादी अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष मोहमद अल्ताफ व सर्व कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते