आम मुद्देताज्या घडामोडी

परभणी जिल्हातील बांधकाम कामगारांचे विविध मागण्यांची आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी घेतली दखल. कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र

परभणी विषेश प्रतिनिधी शेख वसिम. परभणी जिल्हा अल्पसंख्यांक समाज घटकांचा व कामगारांचा जिल्हा असून तेथे बांधकाम कामगारांची संख्या खूप जास्त प्रमाणात आहे आणि सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडून बांधकाम कामगारांना सरकारी योजनेचा लाभ योग्य प्रकारे मिळत नाही .

आहे . परभणीला मागील काही वर्षांपासून कामगार अधिकारी नसून येथे कामगार अधिकारी पदासाठी अतिरिक्त कार्यभार देऊन इतर अधिकार्यांना पाठविले जात आहे . यामुळे बांधकाम कामगारांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये हेळसांड होत असून बांधकाम कामगारांना कामगार योजनांचा योग्य प्रकारे लाभ मिळत नाही .

तसेच सध्या नियुक्त असलेले बांधकाम अधिकारी हे कामगारांना अपमानकारक वागणूक देत असून त्यांच्या समस्यांचे निराकारणही करीत नाही आहेत . लोकप्रतिनिधींनी याबाबत विचारणा केली असता त्यांनाही उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत . तरी सध्या कार्यरत असलेले अतिरिक्त कामगार अधिकारी यांच्यावरती कारवाई करून परभणी याठिकाणी कायमस्वरूपी कामगार अधिकारी ची नियुक्ती करण्यात यावी

अशी मागणी परभणी जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ चे कार्यकर्ता व परभणी जिल्हातील बांधकाम कामगारांनी दिनांक 28/10/2021 रोजी आमदार डॉ वजाहत मिर्झा यांना करण्यात आली होती त्या संदर्भात आमदार डॉ वजाहत मिर्झा यांनी माहाराष्ट्र राज्यचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना एका पत्रव्दारे कडून परभणी जिल्हातील बांधकाम कामगारांचे विविध मागण्या मंजूर करण्यात यावे

Share now