परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात सामुहिक राष्ट्रगान
जिल्हाधिकारी कार्यालयात सामुहिक राष्ट्रगान
परभणी प्रतिनिधी : राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या निर्णयानुसार देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्षाचा समारोप 17 ऑगस्ट रोजी होणार असून, यानिमित्त राज्यभर सामूहीक राष्ट्रगीत गायनाचे आयोजन करण्यात आले होते. 9 ते 17 ऑगस्ट या

कालावधीत राज्यभरात ‘स्वराज्य सप्ताह’ अंतर्गत विविध कार्यक्रम, उपक्रम राबविण्यात येत असून, या महोत्सवातंर्गत येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहीक राष्ट्रगीत गायनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर,

कल्याण संघटक एस.एस.पाटील, उपजिल्हाधिकारी स्वाती दाभाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी मंजूषा मुथा, नायब तहसिलदार प्रमोद वाकोडकर, जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी सामुहीक राष्ट्रगीत गायन केले.