आम मुद्देताज्या घडामोडीराजकिय घडामोडी

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हा शिवसेनेच्या वतीने बेधडक मोर्चा

परभणी जिल्ह्य प्रतिनिधी. परभणी जिल्ह्यात सुरुवातीला समाधानकारक पाऊस पडल्यामुळे खरिपाची पिके जमात आली होती. परंतु नंतर ऑगस्ट महिन्यात मात्र पावसाने तब्बल एक महिना दडी मारल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. पुढे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे उरलेसुरली पिके ही वाया गेली. परिणामी अगोदरच अडचणीत आलेला शेतकरी राजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला. अशी परिस्थिती असतानाही शासनाने

जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर केला नाही. तसेच शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत. जायकवाडी येलदरी, दुधना, सिद्धेश्वर ही धरणे भरलेली असताना शेतीसाठी अद्यापही पाणी सोडलेले नाही. दुसरीकडे ग्रामीण भागात बारा-बारा, सोळा सोळा तासभर नियमन राहत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. परभणी शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. जिल्ह्याची अशी विदारक अवस्था झालेली असताना या प्रश्नावर लढा द्यायचे ठरवून आम्ही सर्वांनी मोर्चाचं नियोजन केलं.

परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे त्वरित द्यावेत, जायकवाडी, येलदरी, दुधना धरणाचे पाणी शेतीसाठी सोडावे. शेतकऱ्यांना 24 तास वीज उपलब्ध करून द्यावी, शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची बिले माफ करावीत, शेतमजूर बेरोजगारांच्या हातांना काम द्यावे अशा विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या गोष्टी वतीने या

भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे साहेब, जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र जी वायकर साहेब, खा. संजयजी जाधव साहेब, आ. डॉ. राहुल पाटील साहेब व जिल्ह्यातील तमाम शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Share now