परभणी जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार अप्पर जिल्हाधिकारी राजेश काटकर यांनी स्विकारला
जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार
अप्पर जिल्हाधिकारी राजेश काटकर यांनी स्विकारला
अन्वर खान प्रतिनिधी . आज दिनांक 31/07/2021 रोजी परभणी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर हे शनिवारी सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या या जागी नुतन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमती गोयल या रुजू होणार होत्या. शनिवारी दुपारी त्या जिल्हाधिकारी या पदाचा पदभार स्वीकारतील असे अपेक्षित होते. त्यादृष्टीने त्या गेल्या दोन दिवसापूर्वी परभणीत दाखल झाल्या.
प्रशासकीय स्तरावर सुद्धा अधिकारी-कर्मचार्यांनी मुगळीकर यांना भावपूर्ण निरोप तसेच श्रीमती गोयल यांच्या स्वागताकरीता भक्कम तयारी सुरु केली होती. परिणामी सायंकाळी चार वाजेपर्यंत गोयल यांनी पदभार स्वीकारला नाही. त्यांच्याऐवजी अतिरिक्त जिल्हाधिकारी काटकर यांना पदभार सोपविण्यात आले.