ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

परभणी जिल्हाधिकारी यांनी आदेश देताच तामिळनाडूतून उसतोड मजुरांची मुक्ता.

परभणी जिल्हा प्रतिनिधी 6 मे रोजी मानवी हक्क अभियानचे परभणी जिल्हा अध्यक्ष पप्पुराज शेळके व ऍक्शन एड संस्थेच जिल्हा समन्वयक यांनी उसतोड मजुरांची नातेवाईक कल्याण सुतारे यांना घेऊन परभणी जिल्हाधिकारी श्रीमती अंचल गोयल मॅडम व पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर यांची दिनांक. ३ मे २०२३ रोजी भेट घेतली व तामिळनाडू

मदुराई येथे परभणी तालुक्यातील आमडापुर येथील ४ व वडवणी ता. जिल्हा बीड येथील ३ ऊसतोड मजुरांना जबरदस्तीने तामिळनाडू मदुराई आंबा समुद्रम उसवमपटी जि.मदुराई येथे नेऊन बंदिस्त करून सकाळी ६ ते रात्री २ वाजेपर्यंत ऊसतोडीचे काम उपाशी पोटी मारहाण करत मुकादम काम करून घेत होता अशी संपूर्ण प्रकरणाची तक्रार देण्यात आली. त्यानंतर लगेच जिल्हाधिकारी श्रीमती अंचल गोयल मॅडम यांनी कामगार अधिकारी यांच्याशी चर्चा केली व त्याच दिवशी रात्री साडेआठ

वाजता मदुराई जिल्हाधिकारी यांना बंधक श्रम उचाटन अधिनियम १९७६ नुसार कलम च्या मुक्त करण्याचे ईमेलद्वारे मजुरांना सोडविण्यासाठी आदेश करून जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक मदुराई यांना देउन व याच्यांशी फोनवरून माहिती दिली. लगेच ४ मे २०२३ रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक मदुराई यांनी आंबा समुद्रम उसलमपटी येथे एक लक्झरी व एक पोलिस व्हन पाठवून रेसक्यू ऑपरेशन करून ७ ही ऊसतोड मजुरांची मुक्त केली व त्यांना मदुराई दादर एक्सप्रेसने बसवून देण्यात आले. तसेच प्रवासास दरम्यान मानवी हक्क अभियान परभणी जिल्हा अध्यक्ष पप्पुराज शेळके हे सतत

संपर्कात होते. आज दिनांक ६ मे २०२३ सकाळी साडे नऊ वाजता . परभणी रेल्वे स्टेशन वर उतरल्यानंतर त्यांच्याशी संपर्क केला व जिल्हाधिकारी यांचे स्विय सहायक मा मठपती, टेकनूर व कामगार अधिकारी , मा.तहसीलदार साहेब यांच्याशी संपर्क करून तक्रारदार कल्याण सुतारे याचे ऊसतोड मजुर नामे. पार्वती कल्याण सुतारे वय ३५.वर्षे पार्वती सुरेश कसबे वय ४० वर्षे सुनिल सुरेश कसबे वय २० वर्षे विशाल आवचारे वय ३० वर्षे लताबाई विशाल आवचारे वय २५ वर्षे अंजली कल्याण सुतारे वय १७ वर्षे नंदिनी विशाल आवचारे वय ४ वर्षे हे

नातेवाईक स्वाधीन करण्यात आले. यावेळी कामगार इन्स्पेक्टर अनवर शेख, शेरखॉ पठाण, नायब तहसिलदार ,कर्मविर ॲड एकनाथराव अवाड साहेब उसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष राजेश घोडे, मानवी हक्क अभियान परभणी जिल्हा अध्यक्ष पप्पुराज शेळके, वडवणी ता अध्यक्ष बाबासाहेब मुजमुले,परभणी मानवी हक्क अभियान शहर अध्यक्ष अरूण सोनवणे, मानवत तालुका उपाध्यक्ष मारोती नवगिरे अदी उपस्थित होते.

तसेच मानवी हक्क अभियान संघटना , कर्मविर अॅड एकनाथराव अवाड साहेब उसतोड कामगार संघटना व सुतारे परिवाराच्या वतीने मा.जिल्हाधिकारी श्रीमती अंचल गोयल मॅडम, पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा आवर कामगार अधिकारी व जिल्हाधिकारी परभणी यांचे स्विय सहायक मा मठपती व टेकनूर यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

Share now