परभणी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कायमस्वरूपी द्या. परभणी जिल्हाधिकारी यांना म. न. पा. सदस्य समरीन फारोक बाबा यांचा निवेदन
परभणी जिल्हा विषेश प्रतिनिधी शेख वसिम. परभणी जिल्हा कामगारांचा जिल्हा असून तेथे बांधकाम कामगारांची संख्या खूप जास्त प्रमाणात आहे आणि सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडुन बांधकाम कामगारांना सरकारी योजनेचा लाभ योग्यप्रकारे मिळत नाही . परभणीला मागील काही वर्षापासून कामगार अधिकारी नसून येथे कामगार अधिकारी पदासाठी अतिरिक्त कार्यभार देऊन इतर
अधिका -यांना पाठविले जात आहे . यामुळे बांधकाम कामगारांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये हेळसांड होत असुन बांधकाम कामगारांना कामगार योजनेचा योग्य प्रकारे लाभ मिळत नाही . तसेच सध्या नियुक्त असलेले बांधकाम अधिकारी हे कामगारांना अपमानकारक वागणूक देत असून त्यांच्या समस्यांचे निराकरणही करीत नाही .
तसेच ऑनलाईन प्रणालीमध्ये वेरीफ़िकेश रेक्वायर्ड मध्ये डोक्मेंट वेरीफाय असा शेरा देऊन रद्द करतात , याचा अर्थ काय आहे आम्हाला समजुन सांगावे . याबाबत लोकप्रतिनिधींनी विचारणा केली असता त्यांनाही उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत . तरी सध्या कार्यरत असलेले अतिरिक्त कामगार अधिकारी यांच्यावरती कारवाईकरुन परभणी या ठिकाणी कायमस्वरुपी कामगार अधिकारीची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी परभणी महानगर पालिका चे सदस्य समरीन बेगम फारोक बाबा यांनी एका निवेदनाद्वारे परभणी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे