परभणी जिल्ह्यातील ऊस गाळप प्रश्नी तातडीने बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील
मुंबई येथील दालनात बैठक घेतली, त्यावेळी आमदार बाबाजानी दुर्राणी उपस्थित
परभणी जिल्ह्यातील ऊस गाळप प्रश्नी तातडीने बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन सहकारमंत्री ना बाळासाहेब पाटील यांनी काल दिनांक 21 मार्च रोजी विधानपरिषदेत आमदार दुराणी यांच्या लक्षवेधी च्या उत्तरात दिले होते, ह्या अनुषंगाने आज सहकारमंत्री यांनी श्री शेखर गायकवाड, महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त पुणे यांना विधानभवनात बोलावून घेत मुंबई येथील दालनात बैठक घेतली, त्यावेळी आमदार बाबाजानी दुराणी यांनी, सहकारमंत्री व साखर आयुक्त यांच्या समोर परभणी जिल्ह्यातील उसाचा निर्माण झालेला गंभीर प्रश्न,

स्थानिक साखर कारखाने यांची भूमिका, ऊसतोड वाल्या कडून होत अडवणूक, व शेतकऱ्यांच्या इतर अडचणी सविस्तर व पुराव्यानिशी त्याच्या समोर मांडल्या , त्यावेळी सहकारमंत्री व साखर आयुक्त यांनी परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील जास्तीचे उसाचे गाळप शिल्लक राहिले आहे म्हणून गंगाखेड, सायखेडा, नरसिंह या तीन साखर कारखान्याना सूचीत केले आहे, तसेच जिल्ह्यातील इतर ऊस उत्पादक शेतकरी व त्यांच्या सर्व अडचणी याची सोडवणूक करण्यात येत असून, येत्या दोन दिवसात संपूर्ण नियोजन करून प्रादेशिक सह संचालक ( साखर) व जिल्हाधिकारी परभणी यांना सूचना करण्यात येत असल्याचे सांगितले ,