परभणी जिल्ह्यातील रास्तभाव दुकानांना CSC केंद्र सुरू करण्यास शासनाकडून मंजूरी
जिल्ह्यातील दोन दुकानदारांना सी.एस.सी. केंद्राचे प्रमाणपत्र वितरीत
परभणी जिल्हा प्रतिनिधी:सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत रास्तभाव दुकानातून धान्यासोबतच नागरिकांना इतर सुविधा पुरविण्याचे अनुषंगाने सीएससी गोरमेंट इंडिया लिमिटेड सरर्विसेस या कंपनीमार्फत रास्तभाव दुकानांना सीएससी केंद्र सुरू करण्यास शासनाकडून मंजूरी देण्यात आली आहे.त्यानुसार रास्तभाव दुकानातून धान्यासोबत इतर ऑनलाईन सेवा सशुल्क नागरिकांना पुरविण्यात येणार आहेत.ज्यामध्ये पुरवठा विभागाशी संबंधित नवीन शिधापत्रिका मागणी, शिधापत्रिकेतील नावात दुरुस्ती, शिधापत्रिकेतील नाव कमी किंवा अधिक करणे
शिधापत्रिकेची मागणी करणे इत्यादी कामासोबतच आयुष्यमान भारत योजना,प्रधानमंत्री फसल विमा योजना,पी.एम.उज्वला कनेक्शन एल पी जी बुकिंग पासपोर्ट व पॅनकार्डसाठी अर्ज,ई-वाहन सारर्थी ट्रान्सपोर्ट सर्व्हीसेस, बँकींग व्यवहार,टिकीट बुकींग विज बिल इत्यादी सेवा सदरील केंद्राकडून नागरिकांना पुरविण्यात येणार आहेत. ज्यासाठी परभणी जिल्ह्यातील 1 हजार 183 रास्तभाव दुकानापैकी 487 रास्तभाव दुकानदार यांनी
सी.एस.सी.केंद्र मिळण्यासाठी अर्ज दाखल केले असून त्यापैकी 114 रास्तभाव दुकानदारांना सी.एस.सी. केंद्राचा आय.डी दुय्यम प्राप्त करून घेतला आहे. सी.एस.सी. करीता आय.डी.प्राप्त करून घेतलेल्या रास्तभाव दुकानांपैकी प्रभु ज्ञानोबा सोळंके व लक्ष्मण मुंढे या रास्तभाव दुकानदाराना सी.एस.सी.केंद्र
मिळाल्याचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी आचंल गोयल यांच्यामार्फत वितरीत करण्यात आले असून या प्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी मंजूषा मुथा, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक निरज धामणगावे,सी.एस.सी.जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक राहूल शेळके व त्यांची टिम उपस्थित होते. तसेच परभणी जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानदार यांनी सी.एस.सी.केंद्र उपलब्ध करून घ्यावे.असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मंजूषा मुथा यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.