आम मुद्देताज्या घडामोडी

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीकडे वळावे

शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीकडे वळावे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचे आवाहन

परभणी प्रतिनिधी. शेतकऱ्यांनी पारंपारिक पिके न घेता फळपिकांकडे वळणे काळाची गरज झाली आहे. शेडनेट, पॉलीहाऊस याकडे शेतकऱ्यांनी वळावे या दोन्हीसाठी भरघोस असे अनुदान मिळत असून यासाठी लागणारी पैशाची तरतूद बँकेकडून मंजूरीसाठी जिल्हाधिकारी या नात्याने संबंधित बँकेला वेळोवेळी पाठपुरावा करुन शेतकऱ्यांना पैसे व अनुदान मिळवून देवून शेतकरी आर्थिक संपन्न करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील. अशी ग्वाही जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी यावेळी दिली.


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त पालम तालुक्यातील मौजे पेठपिंपळगाव, चाटोरी व आजमाबाद येथे फळबाग लागवड कार्यक्रम जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते संपन्न झाला. शेतकरी सतिश मुंदडा यांच्या शेतात कार्यक्रम घेण्यात आला. तसेच पालम नगर पंचायतीच्या वतीने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या उपस्थितीत वृक्षलागवड करण्यात आली. मौजे चाटोरी येथे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते घन वन वृक्ष लागवड अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली. तसेच मौजे पेठपिंपळगाव येथे फळबाग लागवड करुन खातेदार शेतकरी यांची यावेळी ई-पिक पाहणी करण्यात आली. कृषि

विभागामार्फत फळबाग लागवडीसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. शेतकऱ्यांनी पारंपारिक पीक पध्दती सोडून फळबाग लागवडीचा विचार करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास नक्कीच मदत होईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पेठपिंपळगाव, चाटोरी व आजमाबाद येथे फळबाग लागवड व वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील,

तहसीलदार प्रतिभा गोरे, कृषी आयुक्तालयाचे अधिकारी पांडूरंग शिलेदार, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब देशमुख, जि.प.चे माजी अध्यक्ष भाऊसाहेब भोसले, कृषी अधिकारी नागनाथ दुधाटे, पर्यवेक्षक संजिव तमशेटे, कृषी सहायक मुंजाभाऊ दुधाटे, नंदकुमार पवार, कृष्णा भोसले, कैलास शिंदे, काशिनाथ शिंदे, सरपंच जिजाराम अंगीलवाड, राजेश शिंदे आदीची उपस्थिती होती.

Share now