परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी. राजेश विटेकर
विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार यांची भेट घेऊन परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची मागणी केली..
परभणी प्रतिनिधी. जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांने केलेल्या पेरण्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पावसाने जमिनी वाहुन गेल्या असून घराचीही मोठया प्रमाणावर पडझड झाली आहे. स्थावर मालमत्तेचेही मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे पंचनामे अजुनपर्यंत होऊ शकले नाहीत.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी, राज्यात अतिवृष्टी व पूरामुळे झालेले शेतजमीन आणि पिकांचे नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना, नागरिकांना दिलासा देण्यासाठी विधीमंडळाचे अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.

त्या अनुषंगाने मराठवाडा दौऱ्यावर असलेले अजितदादा पवार, माजी मंत्री धनंजय मुंडे साहेब, आ. सतिश चव्हाण साहेब यांची आज सोनपेठ तालुक्यातील उक्कडगाव येथे भेट घेऊन परभणी जिल्ह्यातील पीक परिस्थीती अवगत केली. आगामी अधिवेशनात जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून द्यावी अशी मागणी केली.

यावेळी माझ्यासमवेत चंद्रकांतजी राठोड, लक्ष्मीकांतराव देशमुख, दशरथराव सूर्यवंशी, विठ्ठलराव सूर्यवंशी, पक्षाचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
