आम मुद्देताज्या घडामोडी

परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकयांचे व नागरीकांचे मोठे नुकसान झालेले कुटुंबांना तत्काळ मदत द्या. आमदार बाबाजानी दुर्राणी

संपादक अहमद अन्सारी मागील चार दिवसात परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व नदी नाले ओढे यांना आलेल्या पुरामुळे शेतकयांचे नागरीकांचे मोठे नुकसान झाले आहे हजारो हेक्टर शेतातील मुग सोयाबीन तूर ऊस केळी व इतर पिकांना मोठा फटका बसला आहे ऐन हाता तोंडाशी आलेली पिके उध्दवस्त झाली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचण उदभवली आहे तर मोठ्या

प्रमाणावर जनावरे वाहून गेली मरण पावली त्यांचे ही नुकसान सहन करावे लागत आहे अनेक गावात पाणी घुसुन घरे दारे व जीवनाश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे व या सर्व प्रकरणा सोबतच जिल्ह्यात 2 ते 3 जणांचा मृत्यु झाला आहे . वरील सर्व नुकसानीचे पंचनामे करणे तसेच मयतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे नुकसानीच्या पंचनाम्यासाठी गावनिहाय तलाठी

ग्रामसेवक कृषी सहाय्यक पशुवैद्यकीय कर्मचारी व इतर कर्मचारी यांचे पथके स्थापन करुन व त्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात यावेत जेणे करुन नुकसानग्रस्त शेतकरी नागरीक यांना त्या पथकांशी संपर्क साधून पंचनामे व नुकसानी बाबतचे आक्षेप नोंदविता येऊ शकतील असे एका निवेदनाद्वारे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी सांगितले आहे

Share now