परभणी जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेनेचा जिल्ह्यात रास्ता रोको
अजहर शेख हादगावकर. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेनेचा जिल्ह्यात रास्ता रोको परभणी जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि सतत असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यां च्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे . नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी , यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर खा . संजय जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे . बुधवार १ ९ ऑक्टोबर रोजी जिल्हाभरात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार
खा . संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली होणार आंदोलन असल्याची माहिती खा . जाधव यांनी परभणी जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे . अनेक ठिकाणी अतिवृष्टी होऊन खरिपाचे पीक हातचे गेले आहे . जून महिन्यात सतत पाऊस झाला आहे . ऑगस्ट महिन्यातही पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात सातत्याने पावसाने हजेरी लावली आहे . त्यामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली आली . सोयाबीन कापूस , तूर , उडीद आदी काढणीला आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे . त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे
सतत सुरु असलेला आणि परतीच्या पावसात झालेल्या नुकसानीचा जिल्हा शासकिय यंत्रणेने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी , यासह अन्य मागण्यासाठी बुधवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन खा . जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे . परभणी , पाथरी , मानवत , गंगाखेड , पूर्णा , पालम , जिंतूर , सोनपेठ , सेलू आदी ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार आहे . या आंदोलनात शेतकरी , शिवसैनिकांनी सहभागी होण्याचे आवाहन खा . संजय जाधव यांनी केले आहे