परभणी जिल्ह्यात हर घर तिरंगा’ निमित्त आयोजित सायकल रॅलीस उत्स्फुर्त प्रतिसाद
परभणी जिल्ह्यातील हर घर तिरंगा’ निमित्त आयोजित सायकल रॅलीस उत्स्फुर्त प्रतिसाद
परभणी प्रतिनिधी. आज रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या अभियानातंर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी व महानगरपालिका यांच्या वतीने आज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल रॅलीत जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, मनपा आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर,

जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, जिल्हा क्रिडा अधिकारी नरेंद्र पवार, डॉ. किशोर सुरवसे, डॉ. आघाव यांच्यासह जिल्ह्यातील विविध सायकलींग ग्रूप, शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. ही सायकल रॅलीला छत्रपती शिवाजी महाराज

पुतळा येथुन सुरुवात करुन बसस्थानक, उड्डाणपुल, जिंतुर रोड, दर्गा रोड कमान, शासकीय दवाखाना, शिवाजी चौक, गांधी पार्क, नारायण चाळ, म.फुले पुतळा, प्रशासकीय इमारत मार्ग, वसमत रोड, वसंतराव नाईक पुतळा, विद्यापीठ गेट, खानापुर फाटा, मार्गे परत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे सायकल रॅलीचा समारोप करण्यात आला.