ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

परभणी जिल्ह्यात 1 ते 15 डिसेंबर पर्यंत कलम 36 लागू होणार. पोलीस अधीक्षक रागसुधा आर.

परभणी प्रतिनिधी. परभणी जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन, बाबरी मशीद रामजन्मभूमी संदर्भाने सर्व धर्म वेगवेगळा दिवस पाळतात. तसेच राज्यातील शेतकरी संघटनेतर्फे ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये

यासाठी 1 ते 15 डिसेंबर दरम्यान मुंबई पोलीस कायदा कलम 36 लागू करण्यात आला असल्याचे परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सुचना देण्यात आले आहे. कि परभणी जिल्ह्यात या कलमाअन्वये पोलीस विभागाची तारीख, वेळ,

सभेची जागा, मिरवणुकीचा मार्ग त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा निश्चित केल्याशिवाय आयोजित करु नये तसेच याद रम्यान कोणत्याही नियमांचे किंवा आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी. हा आदेश लग्न वरात, प्रेतयात्रा व धार्मिक कार्यक्रमास लागू होणार नाही. असे त्यांनी आवाहनात सांगितले आहे.

Share now