आम मुद्देताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोकराजकिय घडामोडी

परभणी तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहिर

परभणी, दिनांक . 15 ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतीच्या (सदस्य पदासह पेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीव्दारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.

यामध्ये परभणी तालुक्यातील पिंपळगाव स.मि., शहापुर, पेडगाव, हसनापुर/तुळजापूर, साडेगाव, वाडी दमई, सनपुरी/ सुलतानपूर, साटला, मटक-हाळा, पिंपरी देशमुख, बाभळी, तट्टू जवळा, मिरखेल, पिंगळी बाजार, शेंद्रा, पाथरी, टाकळी कु., नांदखेडा, आसोला, कारेगाव, पारवा, कौडगाव, रायपुर, बाभळगाव, ईठलापुर दे., सायाळा ख. साळापुरी, धसाडी, झाडगाव या 29 ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे.

या निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याची दि. 18 नोव्हेंबर, 2022 असुन नामनिर्देशन पत्रे मागविण्याची व सादर करण्याची दि. 28 नोव्हेंबर, 2022 ते 2 डिसेंबर 2022 असणार आहे. तसेच दि. 5 डिसेंबर 2022 रोजी छाननी करण्यात येणार असून नामनिर्देशपत्र मागे घेण्याचा अंतिम तारीख दि. 7 डिसेंबर 2022 असणार आहे.

निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याची दि. 7 डिसेंबर, 2022 आणि आवश्यक असल्यास मतदानाचा दि. 18 डिसेंबर, 2022 तर मतमोजणीची दि. 20 डिसेंबर, 2022 असणार आहे. तर निवडणूक निकालाची अधिसुचना प्रसिद्ध करण्याची अंतिम दिनांक ही 23 डिसेंबर, 2022 असणार आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहिर केल्यापासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाग टाकणारी कोणतीही कृती / घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहिता कालावधीत कुठेही करता येणार नाही असे तहसिलदार परभणी यांनी कळविले आहे.

Share now