ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र रोखठोक

परभणी पोलीस मुख्यालयातील बहुउद्देशीय हॉलचे.सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोलीस
मुख्यालयातील बहुउद्देशीय हॉलचे लोकार्पण संपन्न

परभणी जिल्हा प्रतिनिधी : येथील पोलीस मुख्यालयात जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून उभारण्यात आलेल्या बहुउद्देशी हॉलचे आज सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.


यावेळी खा. संजय जाधव, खा. फोजीया खान, आ. मेघनाताई बोर्डीकर, आ. राहूल पाटील, आ. रत्नाकर गुट्टे, आ. सुरेश वरपुडकर, जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश मनोज शर्मा, जिल्हाधिकारी आंचल गोयल, पोलीस अधिक्षक जयंत मिना, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, मनपा आयुक्त देविदास पवार, परभणी कुलगुरु डॉ. इंद्र मणी, सहायक पोलीस अधिक्षक अविनाश कुमार यांची उपस्थिती होती.


यावेळी सहकार मंत्री अतुल सावे म्हणाले की, आपले पोलीस बांधव स्वतःचे कुटुंब,सुख-दुःख यांची पर्वा न करता जनतेच्या सेवेसाठी सदैव अहोरात्र काम करतात. कोणत्याही परिस्थितीचा सामाना करण्यासाठी ते सदैव सज्ज असतात. प्रत्येक सणाला आपले पोलीस कर्तव्यासाठी रस्त्यावर दक्ष असतात म्हणून, आपण आनंदाने आणि सुखाने सर्व सण उत्सव साजरे करू शकतो,

त्यांच्या या कार्याप्रती आम्ही सर्वजण कृतज्ञ आहोत. यामुळे ते ज्याप्रकारे आपले रक्षण करतात त्यानुसार आपण त्यांच्यासाठी काहीतरी कल्याणकारी काम करणे अपेक्षित आहे. या उद्देशानेच आज येथे पोलीस बांधवांच्या विविध कार्यक्रमासाठी बहुउद्दीशय हॉलचे लोकार्पण करण्यात आले आहे. याचा निश्चितच पोलीस बांधवांना फायदा होईल.

तसेच औरंगाबादच्या धर्तीवर येथील पोलीस बांधवांसाठी निवासस्थाने उभारण्याबाबत प्रस्ताव सादर करावा. आपण नक्कीच याकरीता पाठपुरावा करु असे हि श्री. सावे यावेळी म्हणाले.
पोलीस अधिक्षक जयंत मिना प्रास्ताविकात म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या विविध कार्यक्रमासाठी हॉल उपलब्ध व्हावा या कल्याणकारी उद्देशाने हा हॉल उभारण्यात आला आहे.

या हॉलचा नक्कीच पोलीस कर्मचाऱ्यांना फायदा होईल.
यावेळी सहकारी मंत्री यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी लोकप्रतिनीधी, पोलीस अधिकारी-कर्मचारी, पत्रकार आदींची उपस्थिती होती.


Share now