आम मुद्देताज्या घडामोडी

परभणी व पाथरी येथे उर्दु अंगणवाडी केंद्र देण्याची मागणी

आ.सुरेश वरपुडकरांना एमडिओ संघटनेचे निवेदन

परभणी: येथील परभणी व पाथरी शहरातील स्लममेरीया भागात उर्दु अंगणवाडी केंद्र देण्याची मागणी पाथरी विधानसभेचे आमदार सुरेश वरपुडकर यांना मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ( एमडीओ ) संघटनेच्यावतीनेनिवेदनाद्वारे करण्यात आली या निवेदनात असे नमूद करण्यात आले की परभणी शहर

महानगरपालिका हद्दीतील इनायत नगर व साखला प्लॉट,सवेरा कॉलनी धार रोड व पाथरी तालुक्यातील शहरात नुर नगर,हयात कॉलनी एकता नगर,अजिज मोहल्ला या भागात ० ते ६ वयोगटातील लहान बालकांची अधिक संख्या अधिक असल्याने तसेच अल्पसंख्याक भागात जवळपास अंगणवाडी नसल्याने नवीन अंगणवाडी निर्माण करण्याची गरज आहे येथील स्लममेरीया

भागातील गोरगरिब गरजू नागरिकांना त्यांच्या पाल्यास प्राथमिक शिक्षण तसेच पोषण आहार मिळण्यासाठी मदत होईल त्या अनुषंगाने परभणी बालविकास अधिकारी ( नागरी प्रकल्प ) यांच्याकडे परभणी व पाथरी शहरी भागातील अनेक पालकांनी अर्ज देऊन नवीन अंगणवाडीची स्थापना करण्यासाठी मागणी करण्यात आली आहे परंतु संबंधित अधिकाऱ्यांकळुन दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते आहे या विषयी या भागात एमडिओ संघटनेकडून सर्वेक्षण करण्यात आलेला आहे तसेच बालकांचे

आधारकार्ड व इतर कागदपत्रे परभणी संबंधित कार्यालयात सादर करण्यात आले आहेत आपण आपल्यास्तरावरून अंगणवाडी केंद्र मंजूरीसाठी शिफारस करुन संबंधितांना आदेशीत करावे जेणे करून कोरोना आपदा काळात अनेक बालक प्राथमिक शिक्षणापासून वंचीत असल्याने त्यांना शैक्षणिक प्रवाहात येता येईल अशी मागणी पाथरी विधानसभेचे आमदार सुरेश वरपुडकर यांना एका

निवेदनाद्वारे परभणी येथील मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ( एमडिओ ) संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे या निवेदनावर एमडिओ संघटनेचे महाराष्ट्र सचिव महेबुब खान पठाण,जिल्हाध्यक्ष सय्यद रफीक पेडगावकर,जिल्हा कार्याध्यक्ष शेख उस्मान शेख इस्माईल पाथरी तालुका अध्यक्ष शेख गणी शेख रहेमान युवा कार्यकर्ते अबु युसुफ उर्फ बबलू पाथरीकर यदिंचे स्वाक्षरी आहे

Share now