परभणी सरकारी कामगार अधिकारी यांना निलंबित करा अन्यथा कार्यालयास युवा विचार मंच संघटनेचा कुलुप ठोकण्याचा इशारा
परभणी सरकारी कामगार अधिकारी यांच्या मंमानी कारभार व योग्य लाभाच्या अर्जाला अ योग्य ठरून मुळ बांधकाम कामगार विविध योजनांचे लाभा पासुन वंचित
परभणी जिल्हा विषेश प्रतिनिधी. परभणी जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना नवीन नोंदणी नुतनीकरण तसेच विविध योजनांच्या लाभासाठि वारंवार सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात चकरामारुन हि लाभ न मिळत असल्याने तसेच काहि एजन्ट दलाल व विशेष लोकांचे अर्ज त्वरीत निकाली काढुन त्यांना लाभ दिला जातो

सामान्य बांधकाम कामगार कल्याणकारी योजना पासुन वंचित राहत आहे सामान्य बांधकाम कामगार यांने परिपुर्ण ऑनलाईन अर्ज भरुन हि सात ते आठ महिने झाल्यावर त्यांना मेसेज येतो कि तुमचा फार्म वगळण्यात आला आहे अधिच सामान्य बांधकाम कामगार यांना वारंवार गेटच्या मारुन अर्थीक फटका तर बसतोच परंतु एजन्ट व दलाल यांचे कामे पटकन होत आहे.परभणी सरकारी कामगार अधिकारी कार्यालया मार्फत

दिनांक .1 सप्टेंबर 2021 ते आजतागायत निकाली निघालेल्या नवीन नोंदणी, नुतनीकरण व विविध योजनांच्या लाभार्थींना कोनत्या निकषांवर लाभ देण्यात आलेला आहे या सर्व प्रकरणाची एक चौकशी समिती नेमुन सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी दिरंगाई करुन व जाणुन बुजुन बांधकाम कामगारांना नोंदणी पासुन वंचित ठेवल्याने ते विविध योजनांच्या वंचित आहे

यात सर्व दोष हा संबंधीत तेथील कार्यकरत अधिकारी व कर्मचारी यांचा असुन त्यांच्यावर पंधरा दिवसात निलंबनाची कार्यवाहि न झाल्यास संघटनेच्या वतिने जिल्ह्यातील सर्व वंचित बांधकाम कामगार यांना सोबत घेऊन सरकारी कामगार अधिकारी कार्यालयास कुलुप ठोकण्याचा इशारा दिला आहे.निवेदनावर युवा विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष पठान अनवरखान तसेच प्रदेशाध्यक्ष पठान करिमखान आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.