ताज्या घडामोडी

पाथरीत राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या ट्रेड युनियन तर्फे रॅली व बोंबाबोंब आंदोलन


संपादक अहमद अन्सरी. बहुजनांच्या हक्क अधिकाराच्या शासन निर्णयाच्या विरोधातील तिसऱ्या टपप्यातील आंदोलन
राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ पाथरी तालुका शाखा व सहयोगी संघटनामार्फत अनु.जाती,जनजाती,भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्गीय कर्मचारी यांच्या संवैधानिक अधिकार संपविण्यार्‍या महाराष्ट्र शासनाच्या धोरणा विरोधात तालुका स्तरीय रॅली व बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.रॅलीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून पासून झाली.बोंबाबोंब आंदोलन तहसिल कार्यालया समोर करण्यात आले.रॅली व बोंबाबोंब आंदोलनाला तहसील कार्यालय समोर विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या संघटनेच्या वतीने समर्थन केले.यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे राज्य प्रभारी टी. जी. नाथभजन यांनी संपूर्ण राज्यात आमच्या

संघटनेचे पदाधिकारी हे समर्थन देऊन प्रत्यक्ष सहभागी झाले आहेत अशी माहिती दिली.तसेच लहुजी क्रांती मोर्चाचे मराठवाडा प्रभारी यांनीही संघटनेच्या वतीने समर्थन केले.नफ चे तालुका प्रभारी प्रा.एम.ए.कांबळे,भारत मुक्ती मोर्चाचे तालुका प्रभारी प्रकाश इंगळे, RMBKS चे कायदेशीर सल्लागार अॅड.हर्षवर्धन नाथभाजन,भीम योद्धा ग्रुप चे वैभव हरबडे यांनी आपापल्या संघटनेच्या वतीने समर्थन दिले.आंदोलनाचा समारोप RMBKS चे तालुका अध्यक्ष सुनील कांबळे यांनी केला.तहसिलदार पाथरी यांना निवेदन दिले.पदोन्नती मधील आरक्षणा विषयी महाराष्ट्र शासनाने १८ फेब्रुवारी,२० एप्रिल व ७ में २०२१ रोजी काढण्यात आलेले शासन निर्णय हे बहुजन विरोधी व सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचा अवमान करणारे आहेत.पद्दोन्नतीतील कोट्यातील रिक्त असलेली सर्व १००% पदे खुल्या प्रवर्गातुन व सेवाजेष्ठते नुसार

भरण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे.या आदेशामुळे अनु.जाती,जमाती,भटके विमुक्त, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्ग प्रवर्गातील कर्मचा-यांना संवैधानिक अधिकार नाकारण्याचा प्रयत्न आहे.शेतकरी विरोधी कायदे,कामगार विरोधी कायदे,शिक्षण क्षेत्रातील खाजगीकरण,गटसाधन केन्द्रातील साधनव्यक्ती व विषय तज्ञ,अंगणवाडी सेविका व मदतनीस,आशा वर्कर यांना वेठबिगारी सारखी वागणुक देण्याच्या विरोधात,नवीन पेन्शन योजना,रोस्टर प्रमाणे भरती न करण्याचा विरोधात व असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी न करण्याच्या विरोधात अशा १४ मुद्द्यांवर हे आंदोलन करण्यात आले.लहूजी क्रांती मोर्चाचे किशोर कांबळे,विलास तेलंगे,राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे एम. एन. भगत,भारत मुक्ती मोर्चाचे प्रकाश इंगळे,डी. एस. बडवणे,असंघटित कामगार संघाचे शिवा कसबे,नरेंद्र कांबळे,सुनील कांबळे,बाबाजी शेळके,किशोर कदम,RMBKS रिक्षा संघाचे दर्शन कांबळे,कृष्णा बोरकर,महेश कदम,बुध्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे प्रमोद कांबळे,आकाश भगत,भारतीय विद्यार्थी मोर्चाचे समाधान गवारे,सचिन कांबळे,रामप्रसाद गवारे,बहुजन मुक्ती पार्टीचे लहू कुमार गालफाडे,नवनाथ कांबळे अशा एकुण ९ संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या

Share now