ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोकराजकिय घडामोडी

पाथरी कूषी उत्पन्न बाजार समिती येथे राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत

पाथरी प्रतिनिधी.पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये १८ जागांसाठी रविवार ३० एप्रिल रोजी मतदान झाले. यावेळी मतदारांचा उत्साह पहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनल विरुद्ध शिवसेना भाजप पॅनल मध्ये यावेळी सरळ लढत झाली होती सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत तसेच पाथरी कृषीउत्पन्न बाजार समितीच्या चुरशिच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ उमेदवार विजयी तर शिव सेना शिंदे गट व भाजपा ६ उमेदवार विजयी झाले पाथरी कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या १८ संचालक पदां साठी ३० एप्रिल रोजी पार पडलेल्या आहेत व

अटितटीच्या निवडणुकीत अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनल ने १२ जागा मिळवल्या तर शिवसेना शिंदे गट व भाजपाला ६ जागी विजय मिळवता आला.पाथरी बाजारसमिती निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार पुढील प्रमाणे.व्यापारी मतदारसंघ विजयी उमेदवार बांगड अमोल ओमप्रकाश ७९,सय्यद गालेब सय्यद इस्माईल ८३ मते पराभूत उमेदवार अन्सारी युसोफोद्दीन रफियोद्दीन अन्सारी जुल्हा ५० मते,नखाते शिवाजी तुकाराम ४८ मते.हमाल-मापाडी मतदारसंघ विजयी उमेदवार शेख दस्तगिर शेख हसन १७२ पराभूत उमेदवार शिंदे आश्रोबा सिताराम १०५ मते

ग्रामपंचायत सर्व साधारण मतदार संघ विजयी उमेदवार टाकळकर किरण भगिरथराव २२०,टेंगसे संदिप शिवाजीराव २२६ पराभूत उमेदवार घुंबरे भागवत तात्यासाहेब १८६,शिंदे सिद्धेश्वर बळीराम १७७.ग्रामपंचायत अर्थिकदृष्ट्या दुर्बलघटक विजयी उमेदवार गलबे संतोष जगन्नाथ २१८,पराभूत उमेदवार शिंदे नितिन नारायण २०१ग्रामपंचायत अनुसुचित जाती/जमाती मतदार संघ विजयी उमेदवार धनले आनंद लक्ष्मणराव २०९,पराभूत उमेदवार तोडके भारत भिमराव २०४.

सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार आरबाड आशोक उत्तमराव १९८,धर्मे शाम उत्तमराव २०५,नखाते अनिल सखाराम २२३,सिताफळे विजयकुमार तुळशिराम २१४.तसेच शिंवसेना शिंदे गट वभाजपा पुरस्कृत गिराम मारोतराव २१९,घांडगे एकनाथ रामचंद्र २१०,प्रभाकर रुस्तुमराव शिंदे २०१.तसेच

सहकारी संस्था महिला राखीव मतदार संघातून विजयी उमेदवार काळे रोहिणी विष्णू २४९.कोल्हे मिनाताई रामप्रसाद २३१.व इतर मागास प्रवर्गातून विजयी उमेदवार सत्वधर संजीव मारोतराव २२४.आणि संस्था विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून विजयी उमेदवार दुगाने गणेश सखाराम २३१ मते.अशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे एकुण १२ ठिकाणी उमेदवार विजयी तर शिवसेना शिंदे गट व भाजपा ग्रामपंचायत ३ आणि सोसायटी ३ अशा ६ ठिकाणी या दोन्ही पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत.

Share now