आम मुद्देताज्या घडामोडी

पाथरी तहसिल पुढे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने बँक ऑफ महाराष्ट्र बेमुदत उपोषण भर पाऊस पडत असताना, शेतकर्‍यांना नवीन पीक कर्ज तात्काळ द्या

संपादक अहमद अन्सारी पाथरी येथे बँक शाखेकडून शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप आपल्या स्तरावरुन करत नाहीत आपणास कारण विचारले असता आपण वारंवार विचारले असता पिक कर्ज मंजुर करतोत अशी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.बँकेने नविन पिक कर्ज मंजुर करुन मे ते जुन महिण्यापर्यंत कर्ज वाटप करावयास हवे होते . परंतु अदयापही एकाही शेतकऱ्याला पिक कर्जाचे वाटप केलेले नाही.बॅक प्रशासनाने शेतकरी विरोधी भूमिका घेऊन शेतकऱ्यांना अर्थिक दृष्टया खूप अडचणीत आणले आहे.महाराष्ट्र शासनाने रितसर

काढलेल्या जी.आर.मध्ये तरतुद असुनहही मात्र बँक प्रशासन कर्ज वाटप करण्यास तयार नाही . बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा पाथरी शेतकरी विरोधी भूमिकेमुळे शेतकऱ्यामध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे.सदर प्रकरणी पुढील मागण्या करत आहोत . तात्काळ पिक कर्ज वाटप करावे.अन्यथा सर्व शेतकरी सह भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्या वतीने तहसील कार्यालय पाथरी येथे दि .16 / 08 / 2021 रोजी पासुन बेमुदत उपोषण करण्यात येत आहे.याची नोंद घेण्यात यावी.जर काही यातुन काही अनुचित प्रकार घडला तर , यास आपले बँक प्रशासन जबाबदार राहील.याची नोंद घ्यावी.ही अशी मागणी करण्यात आली

Share now