ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोकराजकिय घडामोडी

पाथरी तालुक्यातील डाकूपिंपरी येथे अधिकारी आणि वाळू तस्कर यांनी शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान. तत्काळ कारवाई करा आ. बाबाजानी दुर्राणी

अवैध वाळू उपसा करुन शासनाचा महसूल बुडवणाऱ्या वाळू माफियांवर कारवाई. आमदार . बाबाजानी दुर्राणी.

वाळू माफिया आणि वाळू तस्कर यांचा राज्यात सुळसुळाट झाला आहे. वाळू कंत्राटदार हे विविध नावाने वाळूचे कंत्राट घेतात. महसूल प्रशासनाकडून वाळू उपसाची जेवढी परवानगी दिली जाते, त्याहून कितीतरी अधिक पटीने वाळू उपसा केला जातो, याकडे आज मी लक्षवेधी मांडून सभागृहाचे लक्ष वेधले.

पाथरी तालुक्यातील डाकूपिंपरी येथे अधिकारी आणि वाळू तस्कर यांनी संगनमत करुन शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केल्याची बाब सभागृहासमोर आणली. येथील कंत्राटदाराला प्रशासनाने १ कोटी २८ लाखांचा दंड ठोठावला आहे. हा दंड कधी वसूल करणार, असा प्रश्न विचारला.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तरात सांगितले की, संबंधित वाळू कंत्राटदारांना दंड भरण्याची नोटीस देण्यात आली आहे, तो दंड वसूल केला जाईल. तसेच रात्री वाळू उपसा करण्याच्या धोरणाचा राज्य सरकार पुनर्विचार करत असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. अनेक ठिकाणी जेसीबी लावून वाळू उपसा केला जात आहे. बेकायदेशीरपणे हे साहित्य वापरत असल्यास भविष्यात हे साहित्य जप्त करण्यात येईल, असे उत्तर विखे पाटील यांनी दिले.

Share now