ताज्या घडामोडीमनोरंजनराजकिय घडामोडी

पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथे चार कोटी रुपयांचे विकासकामाचे आ बाबाजानी दुर्राणी यांच्या हस्ते भूमिपूजन.

पाथरी तालुक्यात हा विकासाचा पॅटर्न राबवणार- आ.बाबाजानी दुर्राणी.

पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा माझ्या हस्ते व हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला. ज्यामध्ये १ कोटी रुपयांचे पांदण रस्ते, १ कोटी १० लक्ष रुपयांचा कोल्हापुरी बंधारा, ५५ लक्ष रुपयांचा शादीखाना, ४५ लाख रुपयांचे पेव्हर ब्लॉक व सीसी रोड तसेच दलित वस्ती मध्ये पेव्हर ब्लॉक व सीसी रोड २६ लक्ष रुपये, १२ लक्ष रुपयांचा पुल व ४० लक्ष रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना यासाठी मी मंजुरी मिळवली होती.

पाथरी तालुक्यात प्रामुख्याने आपल्याला रेणुका कारखान्याचे एक्सपान्शन करणे, गावोगाव पांदण रस्ते करणे, राज्य व नॅशनल महामार्गाला जोडणारे जोड रस्ते निर्माण करणे आणि उच्च दाबाची आणि २४ तास शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून देणे हे काम पूर्णत्वास न्यायचं आहे. त्यासाठी मी कायम प्रयत्नशील आहे. मागच्या काळात आपण १६ कोटी रुपयांचे बंधारे मंजूर करून आणले त्याचे काम पूर्णत्वास आले आहे. यानंतर अजून १९ कोटी रुपयांचे बंधारे प्रस्तवित आहेत.

आतापर्यंत अनेक ठिकाणी पांदण रस्ते आपण पूर्ण केले, यानंतर १६ गावात एकूण ६९ किलोमीटरचे प्रस्तावित रस्ते आहेत. यासाठी मी शासन दरबारी पाठपुरावा करत आहे, लवकरच त्याची मंजुरी आपल्याला मिळेल. तालुक्याला पाणी मुबलक असून त्यासाठी शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न अग्रक्रमाने सोडवण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे.

ज्याप्रमाणे बाभळगाव येथे चार ते पाच कोटी रुपयांचे कामे पूर्ण केले. विकासाचा हा पॅटर्न संपूर्ण पाथरी तालुक्यात राबवायचा आहे. तालुक्याने कायम माझ्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी पक्षाला ताकद दिली आहे. येणाऱ्या काळात सुद्धा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर एकहाती राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवून पवार साहेबांच्या विचाराला बळकटी देण्याचे काम आपण करत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. निश्चितच तालुका सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी सांगितले आहे

Share now