पाथरी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत चा 5 % अपंग कल्याण निधी खर्च करा. प्रहार जनशक्ती पक्ष
शेख इफ्तेखार बेलदार. पाथरी तालुक्याच्या सर्व ग्रामपंचायत चा 5 % अपंग कल्याण निधी खर्च करावा असा कायदा 1995 चा आहे . परंतु आतापर्यंत बऱ्याच ग्रामपंचायतीने 5 % निधी खर्च केला नाही.काही ग्रामसेवकाकडे 5 % निधी साठी विचारणा केली असता वसुलीचे कारण सांगुण दिशाभूल केली जात आहे व अशा प्रकारची उत्तरे ग्रामसेवक देतात . तरी मा.गट विकास अधिकारी साहेब , पंचायत समिती पाथरी यांना विनंती की , पाथरी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने 5 % निधी

खर्च करावा असे आदेश दयावेत .नाहीतर सर्व ग्रामसेवकांवर दफ्तर दिरंगाई कायदयानुसार येत्या 8 निलंबनाची कार्यवाही करावी.व 5 % निधी अपंग दिव्यांग व्यक्तीना येत्या आठ दिवसाच्या आत वाटप करावा .5 % निधीचे वाटप झाले नाही तर , दि .16 / 09 / 2021 वार गुरुवार रोजी आपल्या कार्यालयासमोर प्रहार अपंग दिव्यांग क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य पाथरी तालुक्याच्या वतीने साप सर्प छोडो आंदोलन करण्यात येईल . याची नोंद घेण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली या निवेदन देताना प्रहार दिव्यांग क्रांती अपंग पाथरी तालुका प्रमुख दिपक खुडे व प्रहार केला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे परभणी प्रतिनिधि श्री शाहुराव गावरे व सर्व कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते