पाथरी नगर परिषदचे थकबाकी धारकांचे गाळे सिल करण्यात येईल मुख्याधिकारी कोमल सावरे.
संपादक अहमद अन्सारी. पाथरी प्रतिनिधी. पाथरी शहरातील सर्व मालमत्ताकर पाणीहीकर धारकांनी व जागा गाळा किराया धारकांनी तातडीने नगर परिषदेचे थकबाकी करांची वसुली भरणा करुन घेण्यात यावे अन्यथा पाथरी नगर परिषद मार्फत थकबाकी धारकांचे गाळे सिल करण्यात येणार आहे व पाणी पट्टीकर न भरणा करणारे नागरिकांचे नळ कनेक्शन बंद करण्यात येणार आहे .
याची सर्वांनी नोंद घ्यावी . तसेच पाथरी शहरा तील सर्व नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी आपण आपले मोकाट जनावरे. बैल. गायी. म्हशी. शेळ्या. व इत्यादी जनावरे बांधून ठेवाव्यात अथवा त्यांचा सांभाळ स्वतः करावा सार्वजनिक रस्त्यावर मोकट जनावरे आढळून आल्यास नगर परिषद पाथरी त्या जनावरांना पकडून कोंडवाड्यात टाकण्याचे नियोजन करुन संबंधीत जनावरांच्या मालका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात येईल .
वरील दोन्ही मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे नियोजन श्रीमती कोमल सावरे , मुख्याधिकारी नगर परिषद पाथरी यांनी केले आहे .या मोहिमेमध्ये पाथरी नगरपरिषदेचे कर्मचारी श्री बि.यु. भाले. आर . व्ही . विश्वामित्रे. मुशिरोद्दीन फारोखी मुशीर. सय्यद वाजेद अली. संतोष हुले. अन्सारी रब्बानी. जमील अन्सारी. मुंजा बेदरे. शेख मुस्तफा. नजीर अहेमद खान. शेख समीर. मुख्तार खान इतर कर्मचारी सहभागी होते .