ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र रोखठोक

पाथरी पोलीस स्टेशन येथे अमृत महोत्सव निमित्त विविध कार्यक्रम

पोलीस स्टेशन पाथरी येथे अमृत महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले

संपादक अहमद अन्सारी. पाथरी येथील परभणी पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहिरे यांनी पोलीस स्टेशन मध्ये रांगोळी स्पर्धा घेण्यात आली त्यात नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तर महिलांचा संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली

त्यात शहरातील महिलांनी देखील सहभाग घेऊन अमृत महोत्सव साजरा केला.तसेच पोलिस ठाण्यात दामिनी पथकाच्या मार्फत रक्तदान शिबिराचे उद्घाटन मा.शल्यचिकित्सक डॉ.जगताप साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.

तर कार्यक्रमास 75 रक्तदात्यांनी रक्तदान करुन रक्तदान शिबिरास प्रतिसाद दिला . तसेच उपस्थित शहरातील मान्यवर व पोलीस अधिकारी मा.पो.नि.राहिरे, स.पो.नि.बंदखडके ,पो.उप.नि कराड,तुरनर, पो.ह. गोपाळ रासवे,गजभार, पिंपळपल्ले, राजश्री बहिरे, संगिता वाघमारे आदि यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

Share now