ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

पाथरी पोलीस स्टेशन येथे निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली

अजहर शेख हादगावकर विशेष प्रतिनिधी. पाथरी पोलीस स्टेशन येथे निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली आहे. शहरातील विविध क्षेत्रातील महिला यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. शहरातील विविध क्षेत्रातील महिला तहसीलदार, महिला व बालविकास कार्यालय डॉक्टर ,वकील ,इंजिनियर, सीनियर लेक्चर ,शिक्षिका, डाक विभाग ,एस डी एम कार्यालय, नगरपरिषद,

मंडळ अधिकारी पंचायत समिती या क्षेत्रातील महिला यांची बैठक घेऊन शहरातील महिला व शाळा महाविद्यालय येथील विद्यार्थी सक्षमीकरण करण्यासाठी सर्वच क्षेत्रातील महिला अधिकारी यांनी पुढाकार घेतला आहे. या अधिकारी तेवढ्यावर न थांबता शाळा महाविद्यालये गावातील बचत गट महिला, अंगणवाडी ताई, आशा वर्कर, यांना मार्गदर्शन करणार आहेत त्यात त्यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा, महिला व बालविकास प्रकल्प, बाल लैंगिक अत्याचार कायदा, स्वतः ची स्वच्छता, मासिक पाळी ,पोस्ट खात्याकडून बचत खाते उघडणे या विषयांना संबोधले जाणारे आहे.

तसेच संगिता वाघमारे यांनी त्यांच्या भाषणात म्हणाल्या इतिहास सांगतो जेव्हा जेव्हा महिलांनी नेतृत्व सांभाळलं तेव्हा तेव्हा समाजात क्रांतीच घडवली आहे .त्याच आज शहरात महिलांनी पुढाकार घेऊन बिघडणा-या पिठिला सुधारणे काळाची गरज झाली आहे.प्रमाणे पाथरी तालुक्यात ग्रामीण भागातुन शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणात आहेत . त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शहरातील प्रतिष्ठित महिला वर्ग तसेच पोलीस स्टेशन पाथरी येथील पोलीस निर्भया पथक स्विकारणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे डॉ मंजुषा चौधरी , रुखमीनी जाधव, अॅक्सिडेन्ट कांबळे ,मंगल गायकवाड, पोस्ट आॅफिस येथील महिला नितीन महाविद्यालय

येथील शिक्षिका, कृषी काॅलेज येथील शिक्षिका, आदि उपस्थित होते तर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी पो.नि.गणेश राहिरे,पो.उप.नि.कातिकेश्वर तुरणन महिला कर्मचारी संगिता वाघमारे,राजश्री बहिरे, प्रिती दुधवडे, सुधाकर राऊत उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दुर्गा चव्हाण यांनी केले.

जास्त प्रमाणात आले असल्यामुळे विद्यार्थी हे शिक्षण कमी आणि मोबाईल वापरणे जास्त भर देऊ नये याकडे लक्ष देण्यासाठी हे पथक स्थापन करून भारतीय संस्कृतीप्रमाणे शिक्षण हेच महत्त्वाचे आहे शिक्षणाशिवाय पर्याय नाही मोबाईल मुळे व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम यासारख्या ॲपमुळे पिढी बिघडत जात आहे त्यासाठी शहरातील महिला वर्गांनी एक वेगळा उपक्रम उभारला आहे. यामध्ये महिलांनी महिला व बाल विकास अधिकारी मंगल गायकवाड यांनी शहरातील महिलांना आव्हान केले आहे की ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या मुलींचे लग्न हे अठरा वर्षाखालील किंवा बालविवाह करू नये मुलींना शिक्षण द्यावे सावित्रीची लेक हीच खरी काळाची गरज आहे असे संबोधले आहे.

Share now