पाथरी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे मॅनेजर यांचा मनमानी कारभार
बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पाथरी तालुका पाथरी जिल्हा परभणी येथील बँक मॅनेजर यांचा मनमानी कारभार
संपादक अहमद अन्सारी. पाथरी तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील रहिवासी भारत फुके, रामप्रसाद धर्मे , लिंबाजी वाघमारे, शंकर गिराम, अमृत अण्णा शिंदे. येथील रहिवासी असून या शेतकऱ्यांना बँक मॅनेजर कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत कर्जाच्या फाईल या शेतकऱ्यांनी दोन वर्षापासून दिलेले आहेत परंतु या बँकेचे मॅनेजर कर्ज देण्यासाठी वारंवार चकरा मारायला लावत आहेत काही शेतकऱ्यांनी पहिले कर्ज भरून
देखील दुसरे कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत कर्ज न दिल्यामुळे या शेतकऱ्यांना बी बियाणे आणण्यासाठी आर्थिक अडचणी येत आहेत तरी जिल्हाधिकारी साहेब यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पाथरी व मॅनेजर यांच्यावर कार्यवाही करून त्वरित शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून
देण्यात यावे नसता शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र २१/१०/२०२२ रोजी पासून टाळा ठोको आंदोलन करतील असे निवेदन जिल्हाधिकारी
आँचल गोयल. मॅडम जिल्हाधिकार्यालय परभणी येथे देण्यात आले. खालील निवेदक भारत फुके, लिंबाजी वाघमारे, शंकर गिराम, रामप्रसाद धर्मे, अमृत अण्णा शिंदे, व इतर शेतकरी. उपस्थित होते