पाथरी बाजार समीतीच्या सभापती नखाते.तर उपसभापती शाम धर्मे
पाथरी प्रतिनिधी.पाथरी येथील कूषी उत्पन्न बाजार समितीच्या सहकार क्षेत्रात जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार.बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम राहीले. सोमवारी मतदान प्रक्रियेतून सभापतीपदी सलग दुसऱ्यांदा अनिलराव नखाते यांची तर उपसभापती पदी शाम धर्मे यांची बहुमताने निवड झाली

आहे.पाथरी बाजार समीती ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून आटोकाट प्रयत्न केले गेले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार.बाबाजानी दुर्राणी यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती.शिस्तबद्ध नियोजनात राष्ट्रवादी काँग्रेसने १२ जागेवर दणदणीत विजय मिळवत बाजार समीतीवरील आपले वर्चस्व कायम राखण्यात यश मिळवीले आहे.विजयी मिरवणूकीच्या सांगता प्रसंगी आपल्या निवासस्थानी

आयोजित कार्यक्रमात बोलतांना आमदार.बाबाजानी दुर्राणी म्हणाले की हि निवडणूक सुरूवातीपासून शेवटपर्यंत अटीतटीची झाली.स्वत ला निवडणूक येण्यासाठी पदाधिकारी प्रयत्न करतात तसे आपल्यातील दुसरा कार्यकर्ता निवडणू आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले नाहीत म्हणून ६ जागा गमवाव्या लागल्या.पण यापुढे विरोधकाशी सलगी करणारे पदाधिकारी याना थारा दिला जाणार नाही.अगामी सर्व निवडणुकीत महाविकास आघाडीला सोबत घेऊन सर्व जागेवर विजयी मिळवू

प्रामुख्याने तरूण युवकांना संधी दिली जाईल. लवकरच तरूण युवकाची बैठक घेऊ असे प्रतिपादन आमदार.बाबाजाणी दुर्राणी यांनी केले.यावेळी तारेख दुर्राणी यांचे सह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.पाथरी कृषी उत्पन्न बाजार समीतीची स्थापना २५ जुलै १९९१ रोजी झाली यावेळी आमदार.बाबाजानी दुर्राणी हे पहिले सभापती झाले.त्यानंतर दुसरे सभापती दादासाहेब टेंगसे, तिसरे सभापती प्रभाकर शिंदे,

चौथे सभापती विजयकुमार सिताफळे, पाचवे सभापती दादासाहेब टेंगसे, सहावे सभापती माधवराव जोगदंड हे होते.७ एप्रिल २०१५ रोजी सातवे सभापती म्हणुन अनिलराव नखाते यांची निवड झाली त्यांनी ७ वर्षे बाजार समीतीचे कामकाज उत्तमपणे चालवीले.त्यानंतर आठवे सभापती म्हणून सलग दुसऱ्यांदा अनिलराव नखाते यांची निवड झाली आहे.