ताज्या घडामोडीमनोरंजन

पाथरी येथे अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार बाबाजानी दुराणी यांच्या कडून दोन अत्याधुनिक कार्डिअक अम्ब्युलन्स चे उद्या पाथरी नगरपरिषदेस लोकार्पण सोहळा

आमदार बाबाजानी दुराणी यांच्या आमदार फंडातुन घेतलेल्या दोन अत्याधुनिक कार्डिअक अम्ब्युलन्स चे उद्या पाथरी नगर परिषदेस लोकार्पण

शेख इफ्तेखार बेलदार. पाथरी येथे अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार श्री बाबाजानी दुराणी यांच्या कडून दोन अत्याधुनिक कार्डिअक अम्ब्युलन्स चे उद्या पाथरी नगरपरिषदेस लोकार्पण सोहळा पाथरी येथे श्री. अजित दादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार श्री बाबाजानी

दुराणी यांच्या आमदार फंडातुन घेतलेल्या दोन अत्याधुनिक कार्डिअक अम्ब्युलन्स चे उद्या पाथरी नगर परिषदेस लोकार्पण करण्यात येणार आहेत हृदयविकार मेंदु व इतर गंभीर रुग्णांना अनेकदा मुंबई पुणे औरंगाबाद हैदराबाद अश्या ठिकाणी हलवावे लागत असल्याने अश्या प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या कार्डिअक अम्ब्युलन्सची गरज आहे हे लक्षात घेऊन आमदार श्री बाबाजानी दुराणी यांनी आपल्या आमदार विकास निधी मधून

सुमारे 60 लक्ष खर्च करून अश्या अत्याधुनिक दोन कार्डियक अम्ब्युलन्स आणल्या आहेत या अम्ब्युलन्स उद्या दिनांक.22 जुलै 2021 रोजी दुपारी 1.00 वाजता पाथरी नगरपरिषदेत या अम्ब्युलन्स चे लोकार्पण करण्यात येणार आहे पाथरी शहर व पाथरी तालुक्यातील जनतेला तात्काळ आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.गरजेप्रमाणे जिल्ह्यातील रुग्णालये हॉस्पिटलमधील रुग्णासाठी यांनाही ही सेवा उपलब्ध करून दिली

जाणार आहे त्या अनुषंगाने या लोकार्पण सोहळ्यासाठी आमदार श्री बाबाजानी दुराणी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास पाथरी शहरातील सर्व नगरसेवक व्यापारी डॉक्टर्स व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहणार आहेत बुधवार दिनांक 22 जुलै रोजी रोजी दुपारी 1.00 वाजता पाथरी नगर परिषद येथे हा सोहळा पार पडणार आहे या लोकार्पण सोहळ्यास सर्व जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन सौ.मीना नितेश भोरे नगर अध्यक्ष नगर परिषद पाथरी यांनी केले आहे

Share now