ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोकराजकिय घडामोडी

पाथरी येथे आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने आढावा बैठक

संपादक अहमद अन्सारी. परभणी जिल्ह्य प्रतिनिधी. परभणी शिवसेनेचे नवनियुक्त संपर्कप्रमुख माजी मंत्री मा. रवींद्र वायकर प्रमुख उपस्थितीत पाथरी शहरातील ‘मातोश्री निवासस्थानी आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने ‘आढावा बैठक’ आयोजित करण्यात आली होती. यावेळी मा. रवींद्र वायकर

शिवसैनिकांना संपूर्ण ताकदीनिशी निवडणुकांना सामोरे जाण्याचे आवाहन केले.यावेळी मा. रवींद्र वायकर शिवसेना परभणी संपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले.”आगामी निवडणुकांच्या निमित्ताने शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच्या मोठ्या विजयाची तयारी आपल्याला करायचे आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ’80 टक्के समाजकारण, 20 टक्के राजकारण’ या सूत्रानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या

विचारांना साथ देऊन स्वाभिमानी राजकारण करण्याची शपथ घेऊया,असे आवाहन यावेळी बोलताना केले.यावेळी जिल्ह्यातील पक्षकार्याचा आढावा संपर्कप्रमुखांना सादर केला व शिवसेनेच्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या विविध आंदोलने व उपक्रमांची माहिती त्यांना दिली. याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर जिल्हाप्रमुख विशाल कदम, राजू कापसे जी, दीपक बारहाते, रवींद्र धर्मे, मुंजाभाऊ कोल्हे, राहुल पाटील, रणजीत गिराम, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांची मोठी उपस्थिती होती.

Share now