ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र रोखठोक

पाथरी येथे देवेगाव गलबे विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण कार्यक्रम.संपंन

आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संनप झाला.

शेख इफ्तेखार बेलदार. पाथरी तालुक्यातील देवेगाव गलबे येथे आज दिनांक 1 जानेवारी रोजी. 25. 15 योजने अंतर्गत सांस्कृतिक सभागृहासाठी 20 लक्ष रुपये व सिमेंट रस्ता रिंग रोड साठी 5 लक्ष रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. या दोन्ही विकास कामांचे उद्घाटन आज झालेल्या कार्यक्रमादरम्यान करण्यात आले.तसेच ग्रामपंचायत 15 व्या वित्त आयोगामार्फत होणाऱ्या सिमेंट रस्ता व नाली बांधकामाचे उद्घाटन आणि वृक्ष लागवड कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी सरपंच पप्पू गलबे, उपसरपंच संतोष गलबे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामपंचायत कडून केल्या जाणाऱ्या कामांची माहिती दिली व ग्रामस्थांच्या अडचणीचे असणारे काही प्रश्न सोडवण्याची मागणी केली.त्यापैकी गावालगत असणारा नाला व त्यावरील पुलाचे काम लवकरच प्रस्तावित करून ते काम पूर्ण करून घेण्याबरोबरच गावाला

जोडणाऱ्या मुख्यरस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. तसेच गावातील हिंदू स्मशानभूमी व मुस्लिम कब्रस्तानच्या कामाच्या जबाबदारी आ.बाबाजानी दुर्राणी साहेब व जि.प.सभापती दादासाहेब टेंगसे यांनी घेऊन प्रत्येकी 10 लक्ष रुपये देण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.

यावेळी मुंजाजीराव भालेपाटिल, अनिलराव नखाते, दादासाहेब टेंगसे, चक्रधर उगले, विश्वनाथ आण्णा थोरे, दत्ता मायंदाळे, सदाशिव थोरात, राधाकीसन डुकरे, डॉ.महेश कोल्हे, गोपाळ साखरे, संदीप टेंगसे, विष्णू काळे, अमोल भाले, अनिल घांडगे, माऊली गिराम, प्रदीप काळे, अमोल बाचाटे, विलास सत्वधर यांच्यासह परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Share now