Uncategorizedआम मुद्देताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

पाथरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन यशस्वी एका महिन्यात सेलू पाथरी व सोनपेठ राष्ट्रीय महामार्ग दुरुस्त करण्याचे आश्वासन

रास्ता रोको आंदोलन यशस्वी एका महिन्यात सेलू पाथरी व सोनपेठ हा 548 बी राष्ट्रीय महामार्ग दुरुस्त करण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन

पाथरी प्रतिनिधी. पाथरी येथील आज. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित रास्ता रोको आंदोलन आज यशस्वीरित्या पार पडले. मागील अनेक वर्षांपासून दयनीय असलेला सेलू पाथरी व सोनपेठ 548 बी राष्ट्रीय महामार्ग रखडलेला आहे.

या संदर्भात अनेक तक्रारी माझ्याकडे आल्याने रास्ता रोको आंदोलनाचा निर्णय घेऊन आज पाथरी शहरातील सेलू कॉर्नर येथे रास्ता रोको आंदोलन करून शेकडो आंदोलकांनी रस्ता अडवला. यावेळी उपस्थित आंदोलक शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले.

प्रामुख्याने रेणुका व लिंबा असे दोन कारखाने 548 बी या राष्ट्रिय महामार्गावर येतात. त्यामूळे शेतकऱ्यांना ऊस नेण्यासाठी मोठी अडचण होत आहे. तसेच अनेक गावकऱ्यांना याचा त्रास होता, असंख्य खड्डे व वाहनांचे होणारे अपघात याची गंभीर दखल घेऊन या आंदोलनाची दिशा ठरवली गेली. या संदर्भात काल बाजार समिती पाथरी येथील कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत आपण स्वतः या आंदोलनाचे नेतृत्व करणार असल्याचे सांगितले होते.

या अनुषंगाने सकाळी १० वाजता या आंदोलनाला सुरुवात झाली परिसरातील शेकडो कार्यकर्ते, शेतकऱ्यांनी यावेळी हा रस्ता अडवत आंदोलन केले. यावेळी रस्ता दुरुस्तीचे आश्वासन मिळाल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नाही,’ ही भूमिका मी घेतली.

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याबाबत उपस्थितांना आश्वासन दिले.पुढील १० दिवसांत या रस्त्याचे काम सुरू होईल व ते एका महिनाभरात पूर्ण करू असे आश्वासन दिल्यानंतर ‘रास्ता रोको आंदोलन थांबवण्यात आले.

येत्या काळात हा रस्ता होऊन येथील रहदारीची समस्या सुटणार आहे. या आंदोलनाला उपस्थित रहावे, या केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देणारे माझे सहकारी, पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी बांधव आणि नागरिकांना धन्यवाद देतो.

Share now