पाथरी येथे शहजाद लाला यांचा म्हत्वुर्ण शैक्षणिक उपक्रम
पाथरी प्रतीनिधी. पाथरी शहरातील व्यवसाय क्षेत्रात असणारे, सामाजिक क्षेत्राची आवड असाणारे सामाजिक कार्यकर्ते तथा विश्वशांती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे अध्यक्ष शहजाद लाला यांनी पाथरी तालुक्यातील आर्थीक दृष्ट्या दुर्बल घटकातील तसेच गरजू विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परिक्षा या मध्ये १) पोलिस भरती
२) तलाठी भरती, ३) ग्रामसेवक भरती, ४) वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, ग्रुप सी आणि डी ची पुर्ण तयारी आदी बाबत स्पर्धा परीक्षेची तयारी करुन घेण्यासाठी शहरातील नृसिंह काॅलणी येथील आनंदवन इंग्लिश स्कूल मध्ये बॅच सुरु करण्यात आली आहे
तरी या संधीचा लाभ तालुक्यातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन शहजाद लाला यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.
पाथरी शहरातील नृसिंह काॅलणी येथील आंनदवन इंग्लिश स्कूल मध्ये विश्वशांती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या हस्ते करण्यात आले
या वेळी आ बाबाजानी दुर्राणी पाथरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक गणेश राहीरे, पोलीस उपनिरीक्षक जी एन कराड, मुख्याध्यापक सुभाष चिंचाने, रामराव वांगीकर आदींनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे प्रस्तावीक शहजाद लाला यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.आंनद धनले
यांनी केले शेवटी आभार प्रा . कांबळे यांनी मानले.
सदर कार्यक्रमासाठी विध्यार्थी आणि विद्यार्थीनीची मोठ्या संख्येने उपस्थित होती.