क्राईमताज्या घडामोडी

पाथरी येथे 25 लाखांचा गुटखा जप्त. पाथरी पोलीसांनी केली 6 आरोपींना गजाआड

पाथरी शहर प्रतिनिधि अन्वर खान: परभणी जिल्ह्यातील पाथरी पाथरी येथील पाथरी पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी पहाटे दिनांक 30/07/2021 रोजी शहरासह तालुक्यात दोन ठिकाणी धाड टाकत अवैधरित्या विक्रीसाठी आणलेला गुटखा शोध लाऊन धाड टाकून जप्त करण्यात आले यावेळी पोलिसांनी 25 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे व 6 आरोपींना ताब्यात घेतले आहे .

सर्व माहाराष्ट्र राज्यात गुटखा विक्रीस प्रतिबंध असणाऱ्या गुटख्याची खुलेआम विक्री व तस्करी होत असल्याची माहिती पाथरी पोलिसांना मिळाली यावरून पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी पहाटे तीन ठिकाणी कारवाई केली पहिली कारवाई पाथरी येथील शासकीय विश्रामगृह परिसर दुसरी कारवाई हादगाव बु येथील बाबा नखाते यांचा आखाडा तर तिसरी कारवाई ढालेगाव येथील एका हॉटेल समोर

करण्यात आली पोलिसांनी एका चारचाकीसह अन्य 3 वाहने मोबाईल आणि गुटखा असा 25 लाख 52 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल धाड टाकून जप्त केला आहे हि कारवाई स्थानिक पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चिरंजीव दलालवाड. पोलीस उपनिरीक्षक कार्तिकेश्वर तूरनर. पोलीस नायक परमेश्वर थोरे.पोलीस नायक शाम काळे.पोलीस नायक महेश गाजभर आणि पोलीस कॉन्स्टेबल मुस्तफा सयद यांच्या पथकाने केली

Share now