पाथरी येथे L. N. T कंपनीच्या निष्काळजी पणामुळे एक जागीच ठार तर एक गंभीर जखमी
संपादक अहमद अन्सारी. पाथरी येथील १३ डिसेंबर मंगळवार रोजी रात्री दोन वाजता पाथरी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी येथील मोंढ्या समोरील बीड -परभणी हायवेवर भरधाव जाणाऱ्या क्रुलुझर गाडीने मोटरसायकल द्वारे नखाते पेट्रोल पंप जवळील इंदिरानगर येथे आपल्या घरी जाणारे राष्ट्रवादीचे युवा शहराध्यक्ष शेख खालेद यांच्या गाडीला
जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात घडला यामध्ये शेख खालेद गंभीर जखमी झाले असून त्यांना मा. नगराध्यक्ष जुनेद दुर्राणी यांच्या गाडीने अगोदर सह्याद्री हॉस्पिटल परभणी व यानंतर औरंगाबाद येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. या अपघातात आंबेडकरी चळवळीमध्ये तसेच टिपू सुलतान जयंती मध्ये हिरहिरीने भाग घेणारे शेख मोहम्मद या युवकाचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे या घटने नंतर पाथरी शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
भरधाव वेगाने अपघातास कारणी भूत क्रुझर गाडी पाथरी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे झालेल्या अपघातानंतर पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थापन विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. ज्या ठिकाणी सदरील अपघात झाला या ठिकाणी बीड परभणी हायवेवर ना सिग्नल, ना ब्रेकर तसेच कोणतेही ट्राफिकचे पोलीस अधिकारी नेमण्यात आलेले नाहीत. यामुळे पाथरी शहरातील नागरिकातुन रोष व्यक्त होत आहे. राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थापन विभाला आणखीन किती निष्पाप लोकांचे बळी हवे आहेत? या निमित्ताने असा प्रश्न विचारण्यात येत आहे
आज दिनांक .१४ डिसेंबर बुधवार रोजी निधन पावलेल्या शेख मोहम्मद यांच्या संतप्त नातेवाईकांनी व पाथरीतील सुज्ञ नागरिकांच्या वतीने तब्बल तासभर रास्ता रोको करण्यात आले. यानंतर तरी रस्ते निर्माण कंपनी एल अँड टी चे अभियंता व कर्मचारी यांना जाग येईल का? अन्यथा निष्पाप लोकांचा जाणून-बुजून बळी घेणाऱ्या या अधिकाऱ्यावर ३०२ चा गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये? असाही प्रश्न उपस्थित होत आहे