ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

पाथरी शहरातील काही गल्ली मोहल्याची जातीवाचक असलेली नाव बदलून महापुरुषांचे नाव.

गुलाम मुस्तफा अन्सारी. पाथरी शहरातील काही गल्ली मोहल्याची जातीवाचक असलेली नावे बदलून महापुरुषांचे नाव.जिल्हाधिकारी परभणी यांच्या जिल्हास्तरीय समितीस प्रस्ताव सादर करण्यात आला आहे .परभणी तसेच नगर विकास विभागाने शहरी भागासाठी जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याची कार्यपध्दती निश्चित

केल्यानूसार जातीवाचक नावे बदलण्याची कार्यवाही तातडीने करावी असे सूचना दिलेल्या आहे त्यानुसार विचार घेऊन आणि सदर विषयाचे महत्व लक्षात घेऊन पाथरी नगर परिषद हद्दीतील एकुण सहा जातीवाचक नांवे होती सदरील नावे खाली प्रमाणे रहातीलजातावाचक नाव असलल्या वस्तीच पूर्वीचे नाव माळीवाडा पारधीवाडा ब्राह्मण गल्ली ढोर गल्ली कुंभार गल्ली सोनार गल्ली शासन निर्णयानुसार

1. माळीवाडा. चे नाव संत सावता नगर असे आहे 2. पारधीवाडा. जयभवानी नगर साई रोड असे तर 3. ब्राह्मण गल्ली. परशुराम नगर असे आहे 4. ढोर गल्ली नाव. रोहिदास नगर असे 5. कुंभार गल्ली. संत गोरोबा नगर 6. सोनार गल्ली. संत नरहारी नगर असे नाव शासन

निर्णयानुसार ठेवण्यात आले आहे वरील कारणास्तव नगर परिषद पाथरीने दिनांक 18 जूलै 2022 रोजी प्रशासकीय ठराव मंजुर करुन नगर परिषद पाथरी हद्दीतील वस्त्यांची रस्त्यांची व गल्ली मोहल्याची जातीवाचक असलेली नावे बदलून घेण्यात आली असुन सदरील नवीन नावे देण्याबाबतचा अहवाल जिल्हास्तरीय समितीस पाठविण्यात आला आहे .याची शहरातीलसर्व नागरिकांनी नोंद घ्यावी .असे अहवाहान उप विभागीय अधिकारी शैलेश लाहोटी व नगर परिषद पाथरी यांच्या यांनी केली आहे

Share now