पाथरी शहरातील गणेश मंडळांना. जुनैद दुर्राणी यांची भेट
पाथरी शहरातील गणेश मंडळांना सदिच्छा भेटी देऊन युवक, नागरिकांशी संवाद साधला. शहरातील महाराणा प्रताप गणेश मंडळ, जय भवानी गणेश मंडळ, सार्वजनिक गणेश मंडळ, श्रीकृष्ण गणेश मंडळ, राजे छत्रपती गणेश मंडळ, संत ज्ञानेश्वर गणेश मंडळ, सोमेश्वर गणेश

मंडळ,नवयुग गणेश मंडळ व इंदिरानगर येथील गणेश मंडळांना भेट देऊन गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.पाथरी शहरात एकमेकांच्या उत्साहात सर्व धर्मीय लोक सहभागी होतात. शहराच्या परंपरेतून ही सौहार्द

एकतेची रुजलेली आहे. गणेशोत्सवात तरुणांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. यानिमित्ताने गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन आनंद वाटला.

यावेळी आलोक चौधरी, एजाज खान, मुख्तार अली, गोविंद हारकळ, सतीश वाकडे, शहराध्यक्ष सुनील उन्हाळे, युवक शहराध्यक्ष शेख खालेद, अतुल जत्ती उपस्थित होते.