पाथरी शहरातील सर्व शाळामध्ये cctv camera बसून घ्या. पो.नि. गणेश राहिरे
संपादक अहमद अन्सारी. पाथरी येथील आज दि.06/10/2022 दुपारी 4 वाजता पोलीस स्टेशन पाथरी येथे शहरातील सर्व शाळा महाविद्यालय,टिवशन येथील मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांची बैठक घेण्यात आली.
बैठकीला शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय,टिवशन,खाजगी शिकवनी चे शिक्षक हजर होते . पो.नि. गणेश राहिरे यांनी शाळेवर cctv cameraबसवुन घेण्याच्या सुचेना दिल्या तसेच
रोड रोमियो ना आता शहरात फिरणे महागात पडेल पोलीस प्रशासन,शिक्षक व सोशल मिडिया मार्फत वेगवेगळ्या प्रकारे टिम तयार करुण
शहरात गोपनीय पद्धतीने रोड रोमियो वर नजर ठेवली जाईल.
मुलींची छेड काढणाऱ्या रोड रोमियो ची आता गय केली जाणार नाहि तसेच पालकांनी आपली मुले कुठे फिरतात किंवा शहरात मोटारसायकल कशा प्रकारे चालवतात . किंवा कोणत्या मुलींची छेड काढत असतात का हे देखील लक्ष ठेवणे गरजेचे आहे. पोलीस स्टेशन येथे दामिनी पथकाच्या मार्फत वेगवेगळ्या टिम तयार करण्यात आल्या आहेत.
पोलीस निरीक्षक राहिरे यांचे मार्गदर्शना खाली पो.उप.नि कातिकेश्वर तुरनर , संगीता वाघमारे, राजश्री बहिरे, प्रिती दुधवडे, सुधाकर राऊत, राम जैस्वाल आदि ची टिम तयार करण्यात आली आहे.