ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र रोखठोक

पाथरी हादगाव बु. येथील सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन संपन्न

अजहर शेख हादगावकर. पाथरी तालुक्यातील हादगाव बु.येथील सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन सौ. प्रेरणाताई वरपुडकर यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार .सुरेशराव वरपुडकर यांच्या प्रयत्नाने हादगाव बु. येथे सांस्कृतिक सभागृह उभारणीसाठी 19 लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सभागृहाचे उद्घाटन आज संपन्न झाले.पाथरी तालुक्यासह मतदार संघातील विकासासाठी आमदार

.सुरेशराव वरपुडकर साहेबांच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून देण्याच काम करण्यात आलं आहे. तालुक्यातील डांबरीकरण रस्ते, गावाला जोडणारे रस्ते, पुल, गवांतर्गत सिमेंट रस्ते, सांस्कृतिक सभागृह, शेत रस्त्याचं मातीकाम व मजबुतीकरण आशा विविध माध्यमातून मतदार संघाचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न आमदार.सुरेशराव वरपुडकर साहेबांच्या माध्यमातून चालू आहे. तसेच भविष्यातही विविध विकास कामांच्या माध्यमातून मतदार संघाचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करू व

आमदार .सुरेशराव वरपुडकर साहेबांच्या माध्यमातून करणार असल्याच मत यावेळी व्यक्त केलं.यावेळी सरपंच बिभीषण नखाते, ओमजी नखाते, सुभाष नखाते, सुरेशराव नखाते, अजिंक्य भैय्या नखाते, बालासाहेब झिंजान, नितीन नखाते, बाबा ढगे, शुभम कणसे, प्रदीप काळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Share now