पानेगाव येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी भाजपात केला प्रवेश.
अंबड प्रतिनिधी :- अंबड तालुक्यातील मौजे पानेगाव येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य दिनकरराव दराडे, बाळासाहेब बडे, अजित तुपसौन्दर,जनार्धन लेकुरवाळे,शाहूराव आपुट, गणेश पाखरे,बंडू जायभाये,बंडू मुंढे, किशोर तुपसौन्दर,लक्ष्मण बडे, बाबुराव पाखरे,रामजी गोरे, श्रीराम नागरे सर यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा.ना.श्री रावसाहेब
पाटील दानवे व आमदार नारायण भाऊ कुचे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टी मध्ये आमदार नारायण भाऊ कुचे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.या सर्व ग्रामपंंचायत सदस्यांचा आमदार नारायण भाऊ कुचे यांनी पुष्पहार देऊन सत्कार केले व पुढील
वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी माजी जि.प.सभापती भिमराव आबा डोंगरे, जेष्ठ कार्यकर्ते केशव मुंढे,बुथ प्रमुख सतीश सानप,व सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.