पानेगाव येथे तलाव खोलीकरण कामाचे उदघाटन आ.नारायण कुचे यांच्या हस्ते संपन्न
मौजे पानेगाव येथील तलाव खोलीकरण कामाचे उदघाटन आ.नारायण कुचे यांच्या हस्ते संपन्न
अंबड प्रतिनिधी :- मौजे पानेगाव येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा.ना.श्री रावसाहेब दानवे व आमदार नारायण कुचे यांच्या विशेष प्रयत्नातून मौजे पानेगाव येथे तलावातील गाळ उपसा करून तलाव खोलीकरणाच्या कामाचे उदघाटन आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते संपन्न
झाला.यावेळी माजी जि.प.सभापती भिमराव आबा डोंगरे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्रीराम नागरे, पुंजराम मालवदे, अमोल काकडे, जितेंद्र शेरे, सतीश सानप, कनिष्ठ अभियंता स्वामी साहेब, सरपंच परमेश्वर शेळके, रामकिसन घुगे, चंद्रकांत शेळके,मच्छिद्रं तनपुरे, अजिंक्य जाधव, भारत नागरे,सुरेश घुगे, रामेश्वर राऊत, सुनील येडे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.