पिक विमा आणि मोटर पाईप लाईन कर्जाविषयी भाकप पाथरी तालुका कौन्सिलची कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैठक संपन्न
पाथरी प्रतिनिधी. पाथरी तालुक्यात असणाऱ्या ढालेगाव बंधारा लाभ क्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व गावातील शेतकऱ्यांना कृषी सिंचनासाठी नाबार्ड आणि राष्ट्रीयकृत बँकेकडून मोटार पाईप लाईन साठी कर्ज मिळण्यासाठी आणि खरीप हंगामातील पीक विमा नुकसान भरपाई कमी प्रमाणात मिळाल्यामुळे आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी येथे बैठक घेण्यात आलीभाकप आणि अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने

शेतकऱ्यांना मोटार पाईपलाईनसाठी कर्ज मिळण्यासाठी परभणी जिल्हा कचेरी समोर दिनांक 23 नोव्हेंबर 2022 ते 25 नोव्हेंबर 2022 रोजी पर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले होते यादरम्यान जिल्हा प्रशासनाने कॉम्रेड राजन क्षीरसागर आणि आंदोलक शेतकरी यांच्याशी चर्चा करून कर्ज मागणीचा प्रस्ताव मंजूर करून शासन दरबारी पाठवू असे आश्वासन दिले त्यामुळे हे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले तसेच या आंदोलनादरम्यान असे पुढे आले की मोटार पाईपलाईनसाठी शेतकऱ्यांची कर्ज मागणीच नसल्यामुळे नाबार्ड या शेतकऱ्यांसाठी कर्ज देण्याकरता कायद्याने स्थापित केलेल्या शिखर बँकेतून एक लाख 17 हजार कोटी रुपये विविध रस्त्यांच्या कामासाठी कंत्राटदार व कंपन्यांना वाटप करून शेतकऱ्यांना मात्र दीर्घ मुदतीच्या कर्जापासून केंद्र सरकार वंचित ठेवत आहे त्यामुळेच

या विषयावर आज पाथरी येथे शेतकऱ्यांसह बैठक घेण्यात आली या बैठकीत पाथरी येथील रेणुका शुगर्स या कारखान्याच्या ऊस लागवड नोंदी व्यवस्थित नसल्याच्या मुद्दा समोर आला यामुळे कारखाना प्रशासनास नोंदी बरोबर घ्याव्या म्हणून भाकपच्या वतीने 15 डिसेंबर रोजी मार्केट कमिटी ते तहसिल कचेरी पाथरी असा भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात येणार आहे. व यावेळी परभणी जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी पहिले बील 3000/- रुपये प्रतिटन व अंतिम बील 4500/- रुपये देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन शासन व प्रशासनास देण्यात येणार आहे.

तसेच मोटार पाईपलाईन कर्ज तात्काळ मंजूर करण्यात यावे याकरिता कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथील हिवाळी अधिवेशन दरम्यान नागपूर विधानमंडळावर शेतकरी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे ठरवण्यात आले आहे.या बैठकीचे सूत्रसंचालन कॉम्रेड मुंजाभाऊ लिपणे यांनी तर कॉम्रेड ज्ञानेश्वर काळे, कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी कॉम्रेड सुधीर कोल्हे, कॉम्रेड विजय कोल्हे, कॉम्रेड विलास दळवे, कॉम्रेड सिकंदर पठाण, कॉम्रेड बाळासाहेब गायकवाड, कॉम्रेड भारत गायकवाड, कॉम्रेड बडे साब, कॉम्रेड अनिता दुपडे व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिक विमा आणि मोटर पाईप लाईन कर्जाविषयी भाकप पाथरी तालुका कौन्सिलची कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैठक संपन्नपाथरी तालुक्यात असणाऱ्या ढालेगाव बंधारा लाभ क्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व गावातील शेतकऱ्यांना कृषी सिंचनासाठी नाबार्ड आणि राष्ट्रीयकृत बँकेकडून मोटार पाईप लाईन साठी कर्ज मिळण्यासाठी आणि खरीप हंगामातील पीक विमा नुकसान भरपाई कमी प्रमाणात मिळाल्यामुळे आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी येथे बैठक घेण्यात आलीभाकप आणि अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शेतकऱ्यांना मोटार पाईपलाईनसाठी
कर्ज मिळण्यासाठी परभणी जिल्हा कचेरी समोर दिनांक 23 नोव्हेंबर 2022 ते 25 नोव्हेंबर 2022 रोजी पर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले होते यादरम्यान जिल्हा प्रशासनाने कॉम्रेड राजन क्षीरसागर आणि आंदोलक शेतकरी यांच्याशी चर्चा करून कर्ज मागणीचा प्रस्ताव मंजूर करून शासन दरबारी पाठवू असे आश्वासन दिले त्यामुळे हे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले तसेच या आंदोलनादरम्यान असे पुढे आले की मोटार पाईपलाईनसाठी शेतकऱ्यांची कर्ज मागणीच नसल्यामुळे नाबार्ड या शेतकऱ्यांसाठी कर्ज देण्याकरता कायद्याने स्थापित केलेल्या शिखर बँकेतून एक लाख 17 हजार कोटी रुपये विविध रस्त्यांच्या कामासाठी कंत्राटदार व कंपन्यांना वाटप करून शेतकऱ्यांना मात्र दीर्घ मुदतीच्या कर्जापासून केंद्र सरकार वंचित ठेवत आहे त्यामुळेच या विषयावर आज पाथरी येथे शेतकऱ्यांसह बैठक घेण्यात आली या बैठकीत पाथरी येथील रेणुका शुगर्स या कारखान्याच्या ऊस लागवड नोंदी व्यवस्थित नसल्याच्या मुद्दा समोर आला
यामुळे कारखाना प्रशासनास नोंदी बरोबर घ्याव्या म्हणून भाकपच्या वतीने 15 डिसेंबर रोजी मार्केट कमिटी ते तहसिल कचेरी पाथरी असा भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात येणार आहे. व यावेळी परभणी जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी पहिले बील 3000/- रुपये प्रतिटन व अंतिम बील 4500/- रुपये देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन शासन व प्रशासनास देण्यात येणार आहे.तसेच मोटार पाईपलाईन कर्ज तात्काळ मंजूर करण्यात यावे याकरिता कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथील हिवाळी अधिवेशन दरम्यान नागपूर विधानमंडळावर शेतकरी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे ठरवण्यात आले आहे.या बैठकीचे सूत्रसंचालन कॉम्रेड मुंजाभाऊ लिपणे यांनी तर कॉम्रेड राजन क्षीरसागर. कॉम्रेड ज्ञानेश्वर काळे, यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी कॉ,सुधीर कोल्हे,कॉ नारायण दळवे कॉ, बाबा टेकाळे कॉ विजय कोल्हे कॉम्रेड बालासाहेब गायकवाड, कॉम्रेड भरत गायकवाड कॉ, शिवप्रसाद फोपसे कॉ, कॉ सिकंदर पठाण कॉ,भारत गायकवाड, कॉ, बडे साब, कॉ, अनिता दुपडे कॉ, कोडीराम शिंदे कॉ, ज्ञानेबा कदम कोडीराम घाडगे दिनेश घाडगे व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.