आम मुद्देताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

पोलीस स्टेशन पाथरी येथे निर्भया पथकाच्या माध्यमातून विद्यार्थी मार्गदर्शन

पोलीस स्टेशन पाथरी येथे निर्भया पथकाच्या माध्यमातून विद्यार्थी मार्गदर्शन पासुन जवळच असलेल्या पाथरी तालुक्यातील रामपुरी येथे शांताबाई नखाते विद्यालय येथे विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले.काहि दिवसांपुर्वी च पोलीस स्टेशन पाथरी येथे निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली आहे.त्यात शहरातील प्रतिष्ठित महिला वर्ग यांनी सहभाग घेतला असुन त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते.

विद्यार्थी यांना डॉ.चौधरी मॅडम यांनी मुलींच्या आरोग्याविषयी तसेच मासिक पाळी बद्दल मार्गदर्शन केले.तर महिला व बालविकास अधिकारी मंगल गायकवाड यांनी बालविवाह प्रतिबंधक विषयी मार्गदर्शन केले तसेच निर्भया पथकातील पोलीस जमादार यांनी संगीता वाघमारे यांनी बाल लैंगिक शोषणाच्या कायद्याबद्दल माहिती दिली.महिला पोलीस राजश्री बहिरे यांनी हि विद्यार्थ्यांशी संवाद साधला शाळेचे मुख्याध्यापक श्री शेळके सर सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Share now