महाराष्ट्र रोखठोक

प्रधानमंत्री आवास योजना पासुन वंचित राहावे लागत असल्याची तक्रार..शेत मजुरदारांची अवहेलना…

गंगाखेड प्रतिनिधी सुरेश सालमोटे : गंगाखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरिबांना प्रधानमंत्री आवास योजना पासुन वंचित राहावे लागत असल्याची तक्रार दामपुरी ग्रामपंचायत जुनी उघडेवाडी येथील शेतमजूरदार बालाजी माधव हाके व समाजसेवक तुकाराम हाक यांनी दिली आहे. भारतीय नागरिकांना साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सव् सामान्य माणसाला स्वतःचे घरकुल बांधकाम करुन देणारी प्रधानमंत्री आवास योजना अतंग् त संपूर्ण भारत देशात लागू करण्यात आली आहे. पण गोरगरिबांना नागरिकांना महाराष्ट्रतील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघात प्रधानमंत्री घरकुल आवास योजना संथ गतीने चालु आहे काही ठिकाणी लाभार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे . गंगाखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील दामपुरी ग्रामपंचायत अतंग् त जुनी उघडेवाडी येथील नागरिकांना /गोरगरिबांना शासनाची प्रधानमंत्री आवास योजना रखडल्याने वंचित राहावे लागत आहे. प्रधानमंत्री आवास योजना चा लाभ लाभार्थ्यांना मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे .दामपुरी जुनी उघडेवाडी येतील शेतमजूरदार बालाजी माधव हाके यांनी आपली तक्रार दाखल केली की…. मी अपंग शेतमजुरदार असुन. मला राहयला योग्य घर नाही .झोपडी व कुडाचे घर असुन. पाऊस पडला की बेहाल होतात, घरात ४सदस्य आहेत. गरीब परिस्थिती आहे. घरात कमावता मी एकटाच आहे. पण गोरगरिबांना शासनाची प्रधानमंत्री आवास योजना दामपुरी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने घरचा सर्वे केला, ग्रामसेवक, सरपंच यांनी नाव यादी तयार करून पाठवतो म्हणून नावे घरचा फोटो काढून घेण्यात आला पण अजुन दोन वर्षे पूर्ण होत असून आपल्याला पंतप्रधान आवास योजना पासुन वंचित राहावे लागले आहे .याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची ग्रामसेवक व सरपंच यांची आहे. पण त्यांच्या कडुन कोणताही लाभ लाभार्थ्यांना मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे…लाभार्थ्यांना घरकुल योजना पासुन वंचित का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जाणां घरकुलांची गरज नाही त्यांना घरकुल मंजुर केले जात आहे याबाबत तक्रार दाखल करीत आहे…
समाजसेवक तुकाराम हाके यांनी परभणी जिल्हाधिकारी व तहसीलदार साहेब यांना गंगाखेड तालुक्यातील प्रधानमंत्र आवास योजना ची सखोल चौकशी करण्यात यावी यासाठी
निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. गंगाखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना गोरगरिबांना पंतप्रधान आवास योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे

Share now