बदनापूर चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जोडे मारो आंदोलन..
बदनापूर प्रतिनिधी :- वंचित बहुजन आघाडी च्या वतीने महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथील जाहीर सभेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांबद्दल अपशब्द वापरल्याने चंद्रकांत पाटील यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा व त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात
यावा.मनोज गरबडे व त्यांचे सहकारी त्यांच्यावरील ३०७ सारखे दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे.पोलीसांचे निलंबन तात्काळ मागे घेण्यात यावे.व पत्रकारावर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी च्या वतीने
घोषणाबाजी करीत चंद्रकांत पाटील च्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करुन असे मागनीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.यावेळी प्रकाश मगरे, दिपक खांडेकर, मुरलीधर बोबडे,हरीष बोरुडे, ज्ञानेश्वर बोबडे, रामेश्वर गाडगे, प्रकाश खरात, भास्कर मगरे,ज्योती खरात,व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.