आम मुद्देताज्या घडामोडीराजकिय घडामोडी

बदनापूर येथे राज्यपाल कोषारी च्या निषेधार्थ सर्व पक्षीय बैठक संपन्न

राज्यपाल कोषारी च्या निषेधार्थ सर्व पक्षीय बैठक बदनापूर येथे संपन्न राज्यपाल कोषारी यांच्या गलिच्छ वक्तव्यावर बदनापूर ७ डिसेंबर रोजी सर्व व्यापाऱ्यानी आपले दुकान बंद ठेवून निषेध व्यक्त करावे

बदनापूर , ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ निषेधार्थ मराठा समाजाच्या मनामध्ये तीव्र भावना असून त्यामुळे भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ दिनांक ७ डिसेंबर रोजी बदनापूर तालुका सह

बदनापुर शहर मध्ये सर्व व्यापाऱ्यानी आपले दुकान ठेवून निषेध व्यक्त करावे असे आयोजन सर्व समाजातर्फे करण्यात येणार आहे . यानिमित्ताने. परमेश्वर नाईकवाडे यांच्या निरंकारी पंपवर येथे सर्व समाजाची भव्य बैठक घेण्यात आली व त्या बैठकीमध्ये ७ डिसेंबर ला बदनापूर तालुक्यातील सर्व व्यापाऱ्यानी आपले दुकान ठेवून निषेध व्यक्त करावे ठराव मांडण्यात आला . त्याचबरोबर विविध विषयांवर बैठकीत

चर्चा करण्यात आली . या बैठकीसाठी. संजय लाखे पाटिल, पंकज जऱ्हाड, काँगेस पक्षांचे तालुका अध्यक्ष सुभाष मगरे, जयसिंग राजपूत, राजेश जऱ्हाड ,भरत जऱ्हाड, नंदू दाभाडे, संजय जगदाळे,परमेश्र्वर नाईकवाडे, सय्यद मुजम्मिल, शेख इकबाल, पोलिस मिञ संघटना न्यू दिल्ली चे जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार शेख नजीर इनामदार,शेख जावेद बागवान, राम पाटिल सिरसाठ, राहूल जऱ्हाड,बहुसंख्य सर्व समाज बांधव उपस्थित होते

Share now