आम मुद्देताज्या घडामोडी

बरबडावाडी या गावला जाणारा रस्ता हा अनेक वर्षापासून चिखलामध्ये नागरिकांना बरबडयाला येजायाबाबत तीव्र नाराजी


नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर

या रस्त्याची दुरवस्था खूप मोठ्या प्रमाणात झाली असून,या रस्त्या अभावी येथील नागरिकांना मरणयातना सोसाव्या लागत आहेत.पावसाळ्यात एखाद्या आजारी व्यक्तीला दवाखान्यात नेताना भयंकर त्रास या नागरिकांनी कित्येकदा सहन केला.गतवर्षी एका महिलेला दवाखान्यात नेताना वाटेतच त्या महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला.शेवटी कंटाळून गावकरी मंडळीनी एकत्र येऊन या रस्त्यासाठी आवाज उठवायला सुरुवात केल्यामुळे आता राजकीय पुढाऱ्यांनी देखील हा विषय आपापल्या नेत्यांपुढे लावून धरला आहे.

तीनशे लोकवस्ती असलेल्या या गावचा रस्ता जिल्हा परिषदेच्या मालकीचा असून,ग्रामीण मार्ग क्रमांक १ या दर्जाचा आहे.सध्या जिल्हा परिषदेवर काँग्रेसचे वर्चस्व असल्याने राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जर मनावर घेऊन एकमेव पर्याय असलेल्या बरबडावाडी रस्त्यासाठी अपेक्षित असलेला अंदाजे १ कोटी रुपयांचा निधी जिल्हा वार्षिक योजनेतून किंवा अन्य कुठल्याही योजनेतून मिळवून दिला तर दळणवळण करण्यासाठी अंत्यंत कठीण असलेल्या व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच होणाऱ्या रस्त्याच्या कामाला वेळ लागणार नसल्याचं भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Share now