ताज्या घडामोडी

बहुआयामी,अष्टपैलू कुशल संघटक शिक्षणप्रेमी व कर्मयोगी व्यक्तीमत्व :- बाळासाहेब पांडे मांजरमकर

नांदेड जिल्हा प्रतिनिधी सय्यद अजिम नरसीकर :- पत्रकार, लेखक ,संवेदनशील माणूस आणि समाजाची सुखदुःख अव्याहतपणे आपल्या लेखणीच्या स्तंभातून अविष्कृत करणारा अवलीया शिक्षक पत्रकार,कलावन्त व अष्टपैलू संघटक म्हणजे बाळासाहेब पांडे मांजरमकर.आज नागपंचमी त्यांचा वाढदिवस या निमित्ताने त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा व जीवनतेजोमय करणारा लेख मांजरम ता नायगाव येथील ग्रामीण भागात 1 आगष्ट 1970 नापंचमी या दिवशी शंकुतलाबाई व रघुनाथराव पांडे यांच्या पोटी जन्मलेले सात बहिणी व एकटे भाऊ असे लाडके

बाळासाहेब पांडे पण त्याचे जीवन मात्र लहान पणा पासूनच संघर्ष मय वातावरणात जीवन कंठीत केले.शब्दांचे शस्त्र हातात घेऊन पत्रकारितेच्या माध्यमातून उपेक्षितांना, वंचितांना, अल्पसंख्यांकांना व त्यांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून लेखन करणारा हा पत्रकार स्वभावाने अतिशय मायाळू, प्रामाणिक आणि नम्र आहे.वरून मात्र नारळासारखा कठीण स्वभाव पण त्यांच्या आत अरुवार खोबरे भरलेली दिसतात .विद्यार्थ्याप्रती प्रचंड कणव असलेला हा शिक्षक आपल्या संगीत कौशल्याने, बहारदार सूत्रसंचालनाने विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रेरणा पेरून विद्यार्थ्यांना सामाजिक सलोख्याचे ज्ञान आणि अध्यापन करतो. शिक्षकांचेही प्रश्न सोडवत शिक्षक

संघटनेमध्ये बाळासाहेब पांडे नावाचं व्यक्तिमत्व कार्यकर्ता म्हणून आहे .वाढदिवस ,लग्न समारंभ ,कुठलाही आस्वादक कार्यक्रम या सगळ्यात बाळासाहेब पांडे हिरीरीने भाग घेतात .त्यांच्या वाडवडिलांकडून त्यांना मिळालेला वसा आणि वारसा ते तर चालवत आहेत पण या पलीकडे जाऊन माणुसकी नावाचं अस्त्र बाळासाहेब पांडे शिताफीने वापरतात .त्यांच्या ठिकाणी कुठलाच भेदभाव नाही .सर्वाभूती समान वागणारा आणि समानतेच्या विचाराची बिजं पेरणारा शिक्षक ,पत्रकार म्हणून अखंडपणे न्याय देण्याचे काम बाळासाहेब पांडे करतात. किर्तन, प्रवचन, भजन ,कुठलीही कला त्यांच्यात अवगत आहे आणि ते स्वतःच्या मर्जीने दिलखुलासपणे सहभागी होऊन इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचं सामर्थ्य बाळगतात. बोलताना प्रचंड

करारीपणा,उत्कृष्ट ध्येयनिष्ठा, प्रचंड आत्मविश्वास या त्रिपुटीने बाळासाहेब पांडे यांचे व्यक्तिमत्त्व भरलेलं आणि भारलेलंआहे. बाळासाहेब पांडे म्हणजे एक सळसळते चैतन्य कधीही चेहऱ्यावर दुःखाचा लवलेस न बाळगता सदाहरित वनाप्रमाणे माणसांना हिरवागार करणारा हा माणूस तेवढाच वृक्षावर प्रेम करणारा आहे. हिरवगार मन घेऊन जपणारा हा माणूस गतिमानतेची उर्मी अंतरंगात साठवून तळागळातील जनसामान्यांच्या अंधारवेदनेला शब्दात मांडणारा प्रतिभावंत आहे. बाळासाहेब पांडे यांच्या

आशीर्वादातून अनेक विद्यार्थी घडलेले आहेत ,एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व गप्पा मारण्यात पटाईत आणि गारुड्याच्या पोतडीतून नवे नवे जादूचे प्रयोग बाहेर पडावेत तसे त्यांच्या बोलण्यातून नव्या नव्या गोष्टी मिळतात अनुभव मिळतो, आनंद मिळतो असं विलोभनीय व्यक्तीमत्व म्हणजे बाळासाहेब. त्यांनी आपले विचार माध्यमातून , नियतकालिकांमधून खेड्यांमधल्या लोकांची मनं, त्यांच्या पिचलेल्या वेदना हाती घेऊन लेखन करत बाळासाहेब पांडे पुण्यनगरी सारख्या दैनिकांमधून व्यक्त होतात. आयुष्यात बरे वाईट अनुभव पचवताना त्यांनी कधी अन्यायाचा मार्ग स्वीकारला नाही त्यांच्या लेखनाने, त्यांच्या अध्यापनाने मुलांना केवळ प्रेरणा,

उत्साह आणि मायेचा ओलावा मिळत गेला .काही कार्य करण्यासाठी माणसांच्या हातात बळ पाहिजे हा भाव मनामध्ये ठेवून सरांनी अव्याहतपणे आपला प्रवास सुरू ठेवला. कठोरतेचे नियम पाळत गुणवत्तेचे रसायन विद्यार्थ्यांना पाजवणारा हा शिक्षक संधी मिळेल तेथे संधीचं सोनं करून विद्यार्थ्यांना भूमिका वठवायला लावून सामाजिक दायित्व फेडतो. साहित्यप्रेमी, अभ्यासू शिक्षणप्रेमी ,रसिक आणि सगळ्यांचा हितचिंतक, तळमळीचा

कार्यकर्ता म्हणून बाळासाहेब पांडे यांचा गौरव करावा असं व्यक्तिमत्व आहे त्यांच्या आज होणाऱ्या ५१ व्या वाढदिवसा निमित्त विरा गणेश हाके या एका बाल गायिकेला व्यासपीठ निर्माण करून देऊन सायंकाळी नायगाव शहरात अभिष्टचिंतन सोहळा ठेवण्यात आला आहे बाळासाहेबांना त्यांच्या प्रचंड चाहता वर्गाकडून भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा वीरभद्र मिरेवाड साहित्यिक व्यंकटेशनगर, नायगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड

Share now